शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रामीण भागात ५० टन मोहफुल जप्त : हातभट्टीच्या दारूसाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:07 IST

उत्पादन शुल्क विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून खुर्सापार नाक्यावर ५० टन मोहफुलाची वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले. ट्रकमधील दोघांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखुर्सापर नाका येथे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्पादन शुल्क विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून खुर्सापार नाक्यावर ५० टन मोहफुलाची वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले. ट्रकमधील दोघांना अटक करण्यात आली आहे.हातभट्टीची दारू निर्माण करण्यासाठी मोहफुलांचा वापर करण्यात येतो. कोणतीही परवानगी न घेता छुप्या पद्धतीने दोन ट्रकमधून ५० टन मोहफुल बाहेर राज्यात नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही विभागाच्या पथकांनी मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास खुर्सापार नाक्यावर या दोन ट्रकला थांबवून तपासणी केली. या दोन ट्रकमध्ये प्रत्येकी २५ टन मोहफुल आढळून आले. हे मोहफुल गुजरातहून आणण्यात आले असून ते महाराष्ट्रातून केळवद मार्गे छत्तीसगडकडे जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. याप्रकरणी ट्रक ड्रायव्हर कमलेश सुग्रीव यादव तसेच सतीश गुरुदयाल यादव या दोघांना अटक करण्यात आली आहे. ते ग्राम भेडी वारंग वाडी जिल्हा बैतूल मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याचे समजते.ही कारवाई केळवदचे ठाणेदार सुरेश मत्तामी, तसेच उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या नेतृत्वात द्वितीय, निरीक्षक बाळू भगत, अब्दुल रहीम सकुर, शिपाई राजेंद्र केवट, वाघजी बोंबले, अहमद बोधले यांनी केली.

टॅग्स :raidधाडExcise Departmentउत्पादन शुल्क विभागPoliceपोलिस