शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

घोरपडीसह रानडुकराचे मांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 23:42 IST

वनविभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी केलेल्या कारवाईमध्ये घोरपड, रानडुकराचे मांस आणि मृत घुबड आॅटोमधून जप्त करण्यात आले. काटोल रोडवरील घोराड फाटाजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनविभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी केलेल्या कारवाईमध्ये घोरपड, रानडुकराचे मांस आणि मृत घुबड ऑटोमधून जप्त करण्यात आले. काटोल रोडवरील घोराड फाटाजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोशन रामराव गणवीर (४३, चिचभवन, वर्धा रोड) व गोलू नेतराम शाहू (२५) यांचा समावेश आहे. कळमेश्वर वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्राधिकारी अर्चना नौकरकर व क्षेत्र सहायक एस. एफ . फुलझेले यांना वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस ऑटोमधून (एमएच/४०/२०१०) नागपूरकडे नेले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून वनविभागाच्या पथकाने घोराड फाट्याजवळ सापळा लावला. संबंधित ऑटो पोहचताच थांबवून तपासणी केली असता ऑटोचालकाच्या सीटखाली तीन प्लास्टिक पिशव्यांमध्ये रानडुकराचे अडीच किलो मांस आढळले. मागील सीटवर मेलेले घुबड आणि जिवंत घोरपड दिसली.या घटनेतील मुख्य आरोपी गणवीर चिकन सेंटरचा संचालक आहे. गोलू त्याच्या दुकानात काम करतो. उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल व एसीएफ प्रज्योत देवबा पालवे यांच्या सूचनेवरून आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २३ जुलैपर्यंत फॉरेस्ट कस्टडी रिमांड सुनावला आहे. ही कारवाई व्ही. एन. कोल्हे, डी.एल. खरबडे, आर. धुर्वे, बी.एस. बोरकर, आर. एम. मोहब्बे व श्रावण यांच्या पथकाने पार पाडली.घोरपडीची नखे कापलेलीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपड जिवंत असली तरी आरोपींनी तिची नखे अत्यंत क्रूरपणे कापलेली होती. यामुळे जखमी घोरपडीला उपचारासाठी सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.