पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:38+5:302021-01-08T04:24:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : पाेलिसांना दारूची आवैध वाहतूक करणाऱ्यास माेठ्या शिताफीने ताब्यात घेतले. झडतीदरम्यान, त्याच्या कारमध्ये पाेलिसांना विदेदी ...

पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : पाेलिसांना दारूची आवैध वाहतूक करणाऱ्यास माेठ्या शिताफीने ताब्यात घेतले. झडतीदरम्यान, त्याच्या कारमध्ये पाेलिसांना विदेदी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतूस, हत्तीमार चाकू या शस्त्रांसाेबत देशी व विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्याने त्याला लगेच अटक केली आणि त्यांच्याकडून पिस्टलसह इतर इतर शस्त्र, कार व दारू असा एकूण ५३ हजार २१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काेराडी (ता. कामठी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेखारा येथे बुधवारी (दि. ६) रात्री १० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
कपिल ऊर्फ सानू संतोष साहू (२२, रा. बाेखारा, ता. नागपूर ग्रामीण) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. बाेखारा परिसरातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती काेराडी पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी बाेखारा गावासह परिसराची पाहणी केली. यात त्यांनी संशय आल्याने गावातील किराणा दुकानाजवळ एमएच-३१/एजी-७७०६ क्रमांकाच्या कारला शिताफीने घेराव केला आणि कपिलला ताब्यात घेत चाैकशी सुरू केली.
झडतीदरम्यान पाेलिसांना कारमध्ये विदेशी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतूस, हत्तीमार चाकू तसेच देशी व विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे तसेच त्याच्याकडी शस्त्र विना परवाना असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांना त्याला अटक केली आणि त्याच्याकडून कारसह सर्व शस्त्र व दारू जप्त केली. या कारवाईमध्ये २५ हजार रुपयांची कार, २० हजार रुपयांची पिस्टल, पाच हजार रुपयांची काडतुसं, २,९६० रुपयांची दारू व २५० रुपयांचा चाकू असा एकूण ५२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलीस निरीक्षक राजेश पुकळे यांनी दिली. ही कारवाई पाेलीस कर्मचारी कल्पना चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. याप्रकरणी काेराडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
....
पिस्टल विक्रेत्याविरुद्ध कारवाई करणार काय?
आराेपी कपिल मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. त्याने विदेशी बनावटीचे पिस्टल मध्य प्रदेशातून आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. न्यायालयाने त्याला दाेन दिवसांची अर्थात शुक्रवार(दि. ८)पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. या काळात त्याने पिस्टल कुठून व कशासाठी खरेदी केले, याबाबत पाेलीस माहिती घेणार आहेत. त्याने नाव सांगितल्यास पाेलीस पिस्टल विक्रेत्याविरुद्ध कारवाई करणार काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.