साडेचार हजार किलो आंबे जप्त

By Admin | Updated: May 30, 2014 01:04 IST2014-05-30T01:04:55+5:302014-05-30T01:04:55+5:30

आंबे पिकविण्यासाठी मानवी आरोग्यास अत्यंत घातक अशा कॅल्शियम कार्बाईड वापर करणार्‍या येथील दोन प्रतिष्ठानांवर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली. या कारवाईत साडेचार हजार किलो आंबे जप्त करण्यात आले.

Seized 4.5 thousand kg of mangoes | साडेचार हजार किलो आंबे जप्त

साडेचार हजार किलो आंबे जप्त

व्यापार्‍यांमध्ये खळबळ : पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर
चंद्रपूर : आंबे पिकविण्यासाठी  मानवी आरोग्यास अत्यंत घातक अशा कॅल्शियम कार्बाईड वापर   करणार्‍या येथील दोन प्रतिष्ठानांवर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली. या कारवाईत साडेचार  हजार  किलो आंबे जप्त करण्यात आले. त्यांची किंमत ६७ हजार ५१0 रुपये एवढी आहे.  गुरूवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईने आंबे विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात शकील ग्रुप कंपनी या नावाचे प्रतिष्ठान असून ते  शकील अहमद अब्दुल हमिद यांच्या मालकीचे आहे. या प्रतिष्ठानातून पिकलेल्या आंब्याची ठोक  भावाने विक्री केली जाते. या ठिकाणी आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला  जात असल्याची गोपनिय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे  गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास महसूल विभाग, वजन मापे विभागाच्या मदतीने सदर  प्रतिष्ठानांवर धाड टाकली.
कारवाई दरम्यान तेथील आंब्याची तपासणी केली असता, आंब्याच्या साठय़ात कॅल्शियम  काबाईडच्या पुड्या ठेवल्या असल्याचे दिसले. त्यामुळे धाड टाकणार्‍या पथकाने लगेच तीन हजार  किलो आंबे जप्त करून पंचनामा केला व नमुने घेण्यात आले.ही कारवाई आटोपताच, या चमूने  त्याच परिसरातील अब्दुल हमिद अब्दुल अजिज याच्या दुकानावर धाड घातली. तेथेही आंबे  पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जात होता. या कारवाईत दुकानातून २२ हजार  ५४0 रुपये किंमतीचे एक हजार ५00 किलो  आंबे जप्त करण्यात आले.
अन्न सुरक्षा अधिकारी एस.पी. नंदनवार, जी.टी. चहांदे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचार्‍यांनी  ही कारवाई केली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक गुन्हे  शाखा पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश  काळे, सहायक उपनिरीक्षक अरुण मोते, दौलत चालखुरे, पद्माकर भोयर, अविनाश तुराणकर  यांचा समावेश होता.
गुरूवारी करण्यात आलेली  चंद्रपुरातील ही पहिलीच कारवाई आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Seized 4.5 thousand kg of mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.