शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पतीकडील वसुलीसाठी पत्नीची मालमत्ता जप्त करणे अवैध :हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 20:40 IST

पतीवरील दंड वसूल करण्यासाठी पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता जप्त केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्दे तहसीलदाराची वादग्रस्त कारवाई रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पतीवरील दंड वसूल करण्यासाठी पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता जप्त केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी एका प्रकरणात दिला.यासंदर्भात खापा (पेठ), ता. सावनेर येथील शालू गोखे यांनी रिट याचिका दाखल केली होती. गोखे यांचे पती योगेश्वर हे रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करतात. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध विविध फौजदारी प्रकरणे दाखल आहेत. दरम्यान, २२ ऑगस्ट २०१७ रोजी सावनेर तहसीलदारांनी योगेश्वर यांच्यावर ३ कोटी ६२ लाख १ हजार ४०० रुपयाचा दंड ठोठावला व ही रक्कम जमीन महसूल म्हणून वसूल करण्यासाठी ७ नोव्हेंबर २०१७ रोजी शालू यांच्या नावावर असलेले दोन भूखंड व दोन वाहने जप्त करण्याची नोटीस जारी केली. त्यावर शालू यांचा आक्षेप होता. लॉजिस्टिक व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून भूखंड व वाहनांची खरेदी केली. त्यासोबत पतीचा काहीच संबंध नाही. त्यामुळे पतीकडील वसुलीसाठी आपल्या नावावरील मालमत्ता जप्त करता येणार नाही. तहसीलदारांनी एकतर्फी कारवाई केली. त्यामुळे ती कारवाई अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, असे शालू यांचे म्हणणे होते.सरकारने उत्तर दाखल करून कारवाईचे समर्थन केले होते. पती-पत्नी मिळून व्यवसाय करतात. मालमत्ता पत्नीच्या नावावर असली तरी ती पतीनेच खरेदी केली आहे, असे सरकारचे म्हणणे होते. न्यायालयाने कायदेशीर तरतुदी लक्षात घेता सरकारची बाजू अमान्य केली. तसेच, तहसीलदाराची कारवाई अवैध ठरवून रद्द केली व त्यांना कायद्यानुसार अन्य कारवाई करण्याची मुभा दिली.निर्णयातील निष्कर्षवसुलीच्या प्रकरणात पत्नी प्रतिवादी नसून तिच्याविरुद्ध कोणता आदेशही जारी झाला नाही. तिच्या नावावरील वाहने अवैध वाहतुकीसाठी वापरली जात होती, असेही कुणाचे म्हणणे नाही. दंड वसूल करण्यासाठी केवळ दोषी व्यक्तीची मालमत्ता जप्त करून ती विकता येते. त्या व्यक्तीच्या पत्नीची मालमत्ता जप्त करता येत नाही. भूखंड व वाहने पत्नीने स्वत: खरेदी केले की तिच्या पतीने हा वादाचा मुद्दा असून या प्रकरणात त्यावर न्यायनिवाडा करता येणार नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने या निर्णयात नोंदविला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे