शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

हे आईच करू जाणे; वाघाच्या जबड्यात होतं लेकीचं डोकं, पण ती लढली... जिंकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 11:16 IST

Nagpur News वाघाच्या जबड्यातून मुलीला सुखरूप बाहेर काढणारी ती आई मुलीच्या चेहऱ्यावरील उपचारासाठी शुक्रवारी शासकीय दंत रुग्णालयात आली. त्यावेळी तिने डॉक्टरांना आपली आपबिती सांगितली, तेव्हा त्यांनीही तिच्या हिमतीला सलाम केला.

ठळक मुद्देवाघाच्या जबड्यातून नव्हे तर मृत्यूच्या दाढेतून तिने मुलीला सोडवलेएका काठीच्या आधारे वाघाला लावले पिटाळूनपाच वर्षीय चिमुकली उपचारासाठी दंत रुग्णालयात

सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पहाटे ५.३० ची वेळ. घरी शौचालय नसल्याने आई जंगलाकडे निघाली. मागेमागे पाच वर्षांची मुलगी होती. अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. ती आई म्हणून ओरडली. मागे वळून पाहताच वाघाच्या जबड्यात मुलीचे डोके पाहून ती घाबरली. परंतु हिंमत हरली नाही. जवळच पडलेली बांबूची काठी उचलून शेपटीवर वार केला. वाघाने मुलीला खाली ठेवत आईवर हल्ला केला. तिने काठीने हल्ला परतवून लावला. पुन्हा वाघाने मुलीला जबड्यात पकडताच आईने काठीने हल्ला चढवला. वाघाने मुलीला जबड्यातून खाली ठेवत आईवर झेप घेणार तोच तिने सर्व शक्ती एकवटून काठीने वाघावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्याने वाघ घाबरून पळून गेला.वाघाच्या जबड्यातून मुलीला सुखरूप बाहेर काढणारी ती आई मुलीच्या चेहऱ्यावरील उपचारासाठी शुक्रवारी शासकीय दंत रुग्णालयात आली. त्यावेळी तिने डॉक्टरांना आपली आपबिती सांगितली, तेव्हा त्यांनीही तिच्या हिमतीला सलाम केला.

चंद्रपूर जिल्ह्यापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेले जुनोना गावातील ही घटना. अर्चना संदीप मेश्राम त्या धैर्यवान आईचे नाव. १ जुलै रोजी घडलेल्या या घटनेची माहिती देताना तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव होते. ती म्हणाली, वाघाच्या जबड्यात रक्ताने माखलेले मुलीचे डोके पाहून आतून थरथर कापत होते. परंतु कुठून हिंमत आली माहीत नाही, वाघाला पोरीचा घास होऊ द्यायचा नाही हे ठरवले. त्यामुळे हाताला बांबूची काठी लागताच त्याने हल्ला चढविला. दुस?्या वेळी जेव्हा मुलीला जबड्यातून खाली ठेवून तो हल्ला चढविणार तीच संधी साधली. मोठा आवाज करीत वाघावर हल्ला चढविला. ती शक्ती माज्यात कुठून आली मलाही माहीत नाही. धिप्पाड वाघ जंगलात पळून जाताना पाहून मलाच माझे आश्चर्य वाटले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या मुलीला कुशीत घेऊन गावाकडे धावत सुटले. पतीच्या मदतीने लागलीच जिल्हा रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. मुलगी धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगताच जीवात जीव आला.

-चेहऱ्याचे हाड अनेक ठिकाणी तुटलेलेचंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात १५ दिवसाच्या उपचारानंतर तेथील डॉक्टरांनी नागपुरातील शासकीय दंत रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यास सांगितले. नागपूर गाठून शुक्रवारी त्या मुखशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातारकर यांना भेटले. त्यांनी त्या माऊलीच्या हिमतीची दाद देत मुलीची तपासणी केली. ह्यएक्स-रेह्णमध्ये चेहऱ्याचे हाड अनेक ठिकाणी तुटल्याचे दिसून आल्याने त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

-चेहऱ्याला पक्षाघात, एक डोळाही बंद होत नाही वाघाची सर्वात जास्त ताकद जबड्यात असते. जबड्याचा उपयोग शिकार करणे, ओढून नेणे आदीसाठी करतो. मुलीचे डोके छोटे असल्याने वाघाचे वरच्या व खालच्या जबड्याचे सुळे मेंदूत शिरले नाही. मानेवर आणि डोळ्याच्या खाली रुतले. यामुळे मुलगी वाचली. परंतु चेहऱ्याचा वरचा जबडा अनेक ठिकाणी तुटला. चेहरा वाकडा होऊन ह्यफेशियल पाल्सीह्ण म्हणजे, चेहऱ्याचा पक्षाघात झाला. मुलीचा उजवा डोळाही बंद होत नाही. मुलीला भरती करून उपचाराला सुरुवात केली आहे. सोमवारी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.-डॉ. अभय एन. दातारकरप्रमुख, मुखशल्यशास्त्र विभाग, शा. दंत रुग्णालय

टॅग्स :TigerवाघHealthआरोग्य