ओबीसी महिला जागृती गावागावात पाेहाेचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST2021-02-23T04:13:34+5:302021-02-23T04:13:34+5:30

सावनेर : ओबीसी महिलांमध्ये जनजागृती करून त्यांना एकत्र करा तसेच प्रत्येक गावात राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची शाखा स्थापन करा, ...

See OBC Women's Awareness in villages | ओबीसी महिला जागृती गावागावात पाेहाेचवा

ओबीसी महिला जागृती गावागावात पाेहाेचवा

सावनेर : ओबीसी महिलांमध्ये जनजागृती करून त्यांना एकत्र करा तसेच प्रत्येक गावात राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची शाखा स्थापन करा, असे आवाहन प्राचार्या डाॅ. शरयू तायवाडे यांनी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या सभेत केले. ही सभा वाकी (ता. सावनेर) येथील छाया डाहाके यांच्या निवासस्थानी नुकतीच पार पडली. यावेळी महासंघाची सावनेर तालुका कार्यकारिणीची घाेषणाही करण्यात आली.

अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या कार्याध्यक्ष डॉ. शरयू तायवाडे हाेत्या तर प्रमुख अतिथी म्हणून महासंघाच्या अध्यक्ष सुषमा भड, प्रभाकर डाहाके, सचिन पर्वते, नीलेश कोढे, रोशन कुंभलकर, मोहन कोढे उपस्थित हाेते. यावेळी सावनेर तालुक्याची कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी छायाताई प्रभाकर डाहाके यांची निवड करण्यात आली असून, कार्याध्यक्षापदी डॉ. वर्षा पर्वते, सचिवपदी सोनाली यशपाल डाहाके, कोषाध्यक्षपदी वैशाली केदार यांची तर सदस्यपदी रंजना सरोदे, प्रतिभा जीभकाटे, पिंकी चिखले, कविता पिसे, रेणुका बेले, स्मिता ठाकरे, विविधा उमाठे, योगीता सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली. सावनेर तालुक्यात प्रत्येक गावात ओबीसी जनजागृती करायची व शाखा निर्माण करण्याचे आश्वासन नवनियुक्त अध्यक्षा छाया डाहाके यांनी दिले.

Web Title: See OBC Women's Awareness in villages