शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  माध्यमिक शिक्षण विभाग अनियंत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:05 IST

नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपेक्षाही व्यस्त माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आहेत. शिक्षण अधिकाऱ्यांबरोबरच त्यांचे कार्यालयही तेवढेच व्यस्त आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींमुळे विभागात सदैव वर्दळ असते. शिक्षणाधिकारी बैठकीत व्यस्त असल्याने, कार्यालयीन व्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे कार्यालयात अव्यवस्था दिसते आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालयात लक्ष नाही आणि वरिष्ठांचे शिक्षणाधिकाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागात सुरू असलेला भोंगळपणाची जाहीर चर्चा अख्ख्या जिल्हा परिषदेत आहे. याचा फटका अभ्यागताना बसतो आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे कार्यालयात आणि वरिष्ठांचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाहीकार्यालयात अव्यवस्था, कागदपत्रांचेअडगळीत पडलेले गठ्ठे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपेक्षाही व्यस्त माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आहेत. शिक्षण अधिकाऱ्यांबरोबरच त्यांचे कार्यालयही तेवढेच व्यस्त आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींमुळे विभागात सदैव वर्दळ असते. शिक्षणाधिकारी बैठकीत व्यस्त असल्याने, कार्यालयीन व्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे कार्यालयात अव्यवस्था दिसते आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालयात लक्ष नाही आणि वरिष्ठांचे शिक्षणाधिकाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागात सुरू असलेला भोंगळपणाची जाहीर चर्चा अख्ख्या जिल्हा परिषदेत आहे. याचा फटका अभ्यागताना बसतो आहे.जिल्हा परिषदेचे सीईओ संजय यादव यांनी जि.प.मध्ये झिरो पेंडेन्सी अभियान राबवून प्रत्येक कार्यालयातील फाईलींचा ढिगारा कमी करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. परंतु जि.प.च्या अखत्यारित येणाऱ्या माध्यमिक शिक्षण विभागात फाईलींचा खच पडून आहे. फाईल्सचे कपाटही धुळीनी भरलेले असून, आलमाऱ्या तुटल्या आहते. विभागात प्रवेश करताच दरवाजातील कूलर, अडगळीत पडलेल्या फाईल्स असे दृश्य विभागात बघायला मिळते. तक्रारी घेऊन आलेले शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची सदैव वर्दळ असते. कर्मचाऱ्यांच्या टेबलवर शिक्षक-कर्मचारी अभ्यागतांचा गराडा बघायला मिळतो. कार्यालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे हे आपल्या कॅबिनव्यतिरिक्त बाहेर कधी डोकावूनच पाहत नाही. कार्यालयातील महत्त्वाच्या फाईल्स उघड्यावर पडल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही उपाययोजना नाही.शिक्षणाधिकाऱ्यांनी अभ्यागतांना भेटण्यासाठी दुपारी ३ ते ५ ही वेळ दिली आहे. परंतु या वेळेत ते फार कमी उपलब्ध असतात, अशा तक्रारी अभ्यागतांनी केल्या आहेत. एका अभ्यागताने सांगितले की, दोन दिवसांपासून त्यांच्या कार्यालयीन वेळेत भेटायला येत आहे, पण ते त्या वेळात येतच नाही. शिक्षणाधिकारी फार कमी काळ विभागात असल्याचे अभ्यागतांचे म्हणणे आहे. विभागात सातत्याने होत असलेल्या बैठकांमध्ये ते व्यस्त असल्याचे कार्यालयातून सांगण्यात येते. कार्यालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायचे असेल तर कार्यालयीन वेळ संपल्यानंतर यावे. अधिकाऱ्यांच्या ‘पीए’ची भलतीच डिमांडमाध्यमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकाऱ्यांचा पीए म्हणून वावरत असणाऱ्या एका स्टेनोग्राफरची भलतीच डिमांड आहे. साहेब बैठकीसाठी असो किंवा अन्य ठिकाणी पीएना सोबत घेऊन जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. कार्यालयात साहेब नाही तर पीएही नसतात. त्यांनाही भेटण्यासाठी अभ्यागत ताटकळत असतात. साहेबांपेक्षा त्याचा दर्जाही काही कमी नाही, असे अभ्यागतांचे म्हणणे आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEducationशिक्षण