दुसऱ्या टप्प्यात मनपा व पोलिसांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST2021-02-06T04:15:23+5:302021-02-06T04:15:23+5:30

नागपूर : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून शुक्रवारी महानगरपालिकेच्या व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात ...

In the second phase, the corporation and the police were vaccinated | दुसऱ्या टप्प्यात मनपा व पोलिसांना लस

दुसऱ्या टप्प्यात मनपा व पोलिसांना लस

नागपूर : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून शुक्रवारी महानगरपालिकेच्या व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. नागपूर जिल्ह्यात आज ३३०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी २५३० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. याची टक्केवारी ७७ टक्के आहे.

शहरात कोविशील्ड लसीकरणाचे २० केंद्र आहेत. यातील १५ केंद्रांना प्रति १०० प्रमाणे १५०० लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी १२९४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. याचे प्रमाण ८६.२७ टक्के आहे. आतापर्यंत १३८०० पैकी १०६३५ (७७.०७टक्के) लाभार्थ्यांना लस देण्यात आली. मेडिकलच्या दोन केंद्रावर कोव्हॅक्सीनची लस दिली जात आहे. आज २०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ११० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. याचे प्रमाण ५५ टक्के आहे. या दोन्ही केंद्रावर आतापर्यंत २२०० लक्ष्य देण्यात आले. त्यापैकी ११०९ (५०.४१ टक्के) लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

- मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली लस

इंदिरा गांधी रुग्णालयाच्या केंद्रावर अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, मिलिंद मेश्राम, महेश मोरोणे, सहायक आयुक्त महेश धामेचा, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर व अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लस घेतली. यावेळी डॉ. संजय चिलकर, डॉ. विजय जोशी, डॉ. किम्मतकर, डॉ. शिलू गंटावार आदी उपस्थित होते.

-मनपाचे १५०० तर पोलिसांचे ८५०० कर्मचाऱ्यांना लस

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन हेल्थ वर्करला लस देण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात मनपा व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यात मनपाचे १५०० तर पोलिसांचे ८५०० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: In the second phase, the corporation and the police were vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.