फरार श्रावणचा शोध

By Admin | Updated: September 23, 2014 01:07 IST2014-09-23T01:07:48+5:302014-09-23T01:07:48+5:30

गत दहा दिवसांपासून वन विभागाला चकमा देत असलेल्या बिबट्याच्या शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे याला अखेर वन विभागाने फरार घोषित करून, त्याच्यावर बक्षीस जाहीर केले आहे.

The search for the fugitive Shrapn | फरार श्रावणचा शोध

फरार श्रावणचा शोध

वन विभाग देणार बक्षीस : बिबट्याचे शिकार प्रकरण
नागपूर : गत दहा दिवसांपासून वन विभागाला चकमा देत असलेल्या बिबट्याच्या शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे याला अखेर वन विभागाने फरार घोषित करून, त्याच्यावर बक्षीस जाहीर केले आहे.
वन विभागाच्या पथकाने गत १२ सप्टेंबर रोजी भिवापूर येथे आरोपी रणजितसिंग जुनी याला बिबट्याच्या चामड्यासह रंगेहात अटक केली होती. परंतु त्याचवेळी मुख्य आरोपी श्रावण हा घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला होता. तेव्हापासून वन विभाग त्याचा शोध घेत आहे. मात्र तो अजूनपर्यंत वन विभागाच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे वन विभागाने दोन दिवसांपूर्वी आरोपी श्रावण वाघमारे याच्या छायाचित्रासह पत्रक जारी करून, त्याची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, आरोपी रणजितसिंगने प्राथमिक चौकशीत श्रावणने त्या बिबट्याची शिकार केली असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे श्रावणला याप्रकरणात मुख्य आरोपी बनविण्यात आले आहे. वन विभागाने दक्षिण उमरेड वन परिक्षेत्राचे आरएफओ एल. एम. बेलेकर यांच्यावर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची धुरा दिली आहे. परंतु त्यांना गत दहा दिवसांपासून मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळालेले नाही. शिवाय वरिष्ठांकडूनसुद्धा आरोपीला पकडण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करण्यात आलेले दिसून येत नाही. त्यामुळेच आरोपी हा आतापर्यंत सर्रास मोकाट फिरत राहिला आहे. दुसरीकडे या घटनेतील मुख्य आरोपी सापडण्यापूर्वीच भिवापूर येथील एका शेतातील झुडपात पुन्हा दुसऱ्या बिबट्याचे चामडे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली असून, वन अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The search for the fugitive Shrapn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.