शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेत बोगस कर्मचाऱ्यांची शोधमोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:52 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदिवासींची खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोकऱ्या बळकाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना हुडकून काढण्यासाठी जिल्हा परिषदेने जोरदार प्रयत्न चालविले आहे़ ३१ डिसेंबरपर्यंत शासनाला ही सर्व माहिती पाठवायची आहे़

ठळक मुद्देशासनादेशानुसार याद्या तयार करणे सुरू

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदिवासींची खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोकऱ्या बळकाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना हुडकून काढण्यासाठी जिल्हा परिषदेने जोरदार प्रयत्न चालविले आहे़ ३१ डिसेंबरपर्यंत शासनाला ही सर्व माहिती पाठवायची आहे़एकट्या पंचायत विभागात पाच कर्मचारी बोगस असल्याचे आढळल्याची माहिती आहे़ सामान्य प्रशासन विभागामध्ये हा सर्व तपशील संकलित होत आहे़ यासाठी स्वतंत्र डेक्सची निर्मिती करण्यात आली आहे़ स्थानिक जिल्हा परिषदेत १७ कर्मचारी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता़ परंतु, ही संख्या आता अधिक वाढण्याची शक्यता आहे़ अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर तत्कालीन परिस्थितीत खोटी कागदपत्रे बनवून अनेकांनी नोकऱ्या लाटल्या होत्या़ त्यातील अनेक कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती झाली तर काही प्रशासनात कार्यरत आहे़ त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती़ मात्र, यापुढे त्यांना शासकीय सेवेत संरक्षण देय ठरत नाही, असे बजावण्यात आले़ याविषयीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातसुद्धा रिट याचिका दाखल होती़ यावर २८ ऑगस्ट २०१८ ला निर्णय झाला़ तोच आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत ३१ डिसेंबरपर्यंत अशा कर्मचाऱ्यांना हुडकून काढा आणि त्यांच्या सेवा समाप्त करा, असे निर्देश दिले होते़ त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे़ जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या आस्थापना विभागात याविषयीची लगबग प्रकर्षाने पहायला मिळते़ नेमके किती कर्मचारी बोगस आहे, याचा आकडा ३१ डिसेंबरलाच समोर येईल़

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरEmployeeकर्मचारी