कळमणा मार्केट परिसरातील सात भोजनालये सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST2021-05-25T04:07:55+5:302021-05-25T04:07:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या लकडगंज झोनचे पथक, पोलीस व एनडीएस जवानांनी सोमवारी कळमणा मार्केट परिसरात शोध ...

Seal seven restaurants in Kalmana Market area | कळमणा मार्केट परिसरातील सात भोजनालये सील

कळमणा मार्केट परिसरातील सात भोजनालये सील

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या लकडगंज झोनचे पथक, पोलीस व एनडीएस जवानांनी सोमवारी कळमणा मार्केट परिसरात शोध मोहीम राबवून सुरू असलेली सात भोजनालये सील केली. यात सूर्या सावजी भोजनालय, जयभोले भोजनालय, संदीप भोजनालय, श्रीकृष्ण भोजनालय, मोरेश्वर भोजनालय, शिवाजी भोजनालय व जयभवानी भोजनालय आदीचा समावेश आहे. तसेच पथकाने सोमवारी

२५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख १५ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ४३ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार, हनुमाननगर पथकाने दोन दुकानांची तपासणी करून ४५ हजार, धंतोलीच्या पथकाने आठ दुकानांची तपासणी करून ४० हजारांचा दंड वसूल केला. नेहरूनगर येथे दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपये, गांधीबाग येथे पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ४० हजार रुपये, सतरंजीपुरा येथे दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये , लकडगंज पथकाने चार दुकानांची तपासणी करून २० हजार रुपये, आसीनगर पथकाने १० प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजाराचा, तर मंगळवारी झोन पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन्‌ बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोधपथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

Web Title: Seal seven restaurants in Kalmana Market area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.