अजनीतील किसनलाल वाईन शॉपला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:20+5:302021-05-25T04:08:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अवैध मद्यविक्री केल्याचे उघड झाल्यामुळे अजनीतील रामेश्वरी चौकाजवळ असलेले किसनलाल वाईन शॉप पोलिसांनी महापालिकेच्या ...

अजनीतील किसनलाल वाईन शॉपला सील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध मद्यविक्री केल्याचे उघड झाल्यामुळे अजनीतील रामेश्वरी चौकाजवळ असलेले किसनलाल वाईन शॉप पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने सील केले.
रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. किसनलाल वाईन शॉपमध्ये अटी, शर्ती झुगारून मद्यविक्री केली जात असल्याची ओरड होत होती. विशिष्ट ग्राहकांना मोठ्या प्रमाणात मद्यसाठा दिला जात होता. ही माहिती मिळाल्यानंतर अजनीच्या पोलीस पथकाने रविवारी सायंकाळी ५.१५ वाजता किसनलाल वाईन शॉपमध्ये छापा टाकला. यावेळी तेथे विजय जवाहरलाल जयस्वाल आणि रमेश रामसिरोमन चतुर्वेदी यांच्याकडे विदेशी मद्याच्या २३ बाटल्या सापडल्या. हा मद्यसाठा अवैधपणे विकला जात असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी महापालिकेच्या पथकाला बोलावून घेतले आणि किसनलाल वाईन शॉपला सील केले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानेही या वाईन शॉपवर कारवाई केली.
पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, सहाय्यक आयुक्त एन. एस. पालवे आणि अजनीचे ठाणेदार विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय निरीक्षक शुभांगी देशमुख, सहाय्यक निरीक्षक संतोष जाधव, नाईक अतुल दवंडे, हंसराज पाऊलझगडे व वीरेंद्र पांडे यांनी ही कारवाई केली.
---