एसडीओंनी दिली नोटीस

By Admin | Updated: July 23, 2015 02:57 IST2015-07-23T02:57:21+5:302015-07-23T02:57:21+5:30

तालुक्यातील चनोडा येथे १७२ हेक्टर परिक्षेत्रात वनीकरणाचे काम करताना गावकऱ्यांना जनावरांच्या चराईबंदीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अटकाव ...

SDO's Diary Notice | एसडीओंनी दिली नोटीस

एसडीओंनी दिली नोटीस

उमरेड : तालुक्यातील चनोडा येथे १७२ हेक्टर परिक्षेत्रात वनीकरणाचे काम करताना गावकऱ्यांना जनावरांच्या चराईबंदीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अटकाव करणाऱ्या वन विभागाला उमरेडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. डॉ. दीप्ती सूर्यवंशी आणि तहसीलदार चंद्रभान खंडाईत यांनी नुकतीच चंोडा येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने पाहणी केली. त्यानंतर काही दिवसांतच कारवाईचे पत्र दिल्याने दक्षिण उमरेड वन परिक्षेत्राला जोर का झटका बसला आहे.
चनोडा गावातील प.ह.नं. ३३ येथील सर्व्हे क्रमांक २६०, ३०३, २९२, २४७, ३०१/१, २५०, २९०, २९३, २५१, २८८, २८३, २३७, २३४, २४८, ३२८ व २९१ या जमिनीवर अनधिकृत वनीकरण सुरू असल्याचे तसेच गुरे चराईच्या निस्तारास मनाई व स्मशानभूमीवरील निस्तारावर बाधा निर्माण केल्याची तक्रार असल्याचे पत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: SDO's Diary Notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.