भंगार कंत्राटदाराची भागीदारांनी केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:06 AM2021-04-17T04:06:57+5:302021-04-17T04:06:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका बड्या भंगार कंत्राटदाराची त्याच्याच भागीदारांनी फसवणूक केली असून, ७१ लाखांचे भंगार परस्पर विकून ...

Scrap contractor cheated by partners | भंगार कंत्राटदाराची भागीदारांनी केली फसवणूक

भंगार कंत्राटदाराची भागीदारांनी केली फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एका बड्या भंगार कंत्राटदाराची त्याच्याच भागीदारांनी फसवणूक केली असून, ७१ लाखांचे भंगार परस्पर विकून आरोपी पळून गेले आहेत.

शाम काशीप्रसाद बोरले यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे अभ्यंकर नगरमध्ये रामधनी एजन्सी नावाने कार्यालय आहे. आरोपी अजय नाथूराम शर्मा, रवी नाथूराम शर्मा आणि गिरीश नारायणभाई राठोड हे बोरेले यांचे व्यावसायिक भागीदार होते. बोरले हे शासकीय आणि खासगी कंपन्यांच्या भंगाराची खरेदी करतात. गेल्यावर्षी त्यांनी मध्य प्रदेशातील सिहोर येथील भंगार विकत घेतले होते. ते त्यांनी नागपूरच्या त्यांच्या गोदामात आणून ठेवले. यानंतर बोरले यांनी आरोपी अजय आणि रवी शर्मा तसेच गिरीश राठोड या तिघांसोबत ते भंगार विकण्यासंबंधीचा करार केला. या कराराप्रमाणे भंगार विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील ५५ टक्के रक्कम बोरले तर २५ टक्के रक्कम आरोपी शर्मा बंधू तसेच राठोड यांनी घ्यायचे ठरले. दरम्यान, २८ जुलै २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत आरोपी शर्मा बंधू आणि राठोड या तिघांनी बोरले यांच्या गोदामातील भंगार काढून जबलपूरसह अन्य काही ठिकाणी विकले. त्यातून त्यांना ७१ लाख रुपये मिळाले. दरम्यान, कराराप्रमाणे ही रक्कम कंपनीच्या खात्यात जमा करायला हवी होती. मात्र, आरोपींनी ती रक्कम स्वतःच्या खात्यात जमा करून बोरले यांची फसवणूक केली. आपल्या भागीदारांनी भंगार विकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रकमेचा हिशेब विचारला असता, आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे बोरले यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. ठाणेदार महेश चव्हाण यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शर्मा बंधू तसेच राठोड या तिघांविरुद्ध फसवणुकीच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

---

आरोपी फरार

तीनही आरोपी हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमंगल विहार या वसाहतीत राहात होते. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी तेथे धडक दिली असता, आरोपी काही दिवसांपूर्वीच तेथून निघून गेल्याचे पोलिसांना कळले.

---

Web Title: Scrap contractor cheated by partners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.