शहरं
Join us  
Trending Stories
1
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
2
BMC Election 2026: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
3
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
4
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
5
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
6
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
7
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
8
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
9
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
10
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
11
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
12
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
13
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
14
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
15
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
16
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
17
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
18
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
19
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘स्क्रब टायफस’कडे २०१२ पासूनच दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 11:54 IST

विदर्भासह बाजूच्या राज्यात वाढत असलेल्या ‘स्क्रब टायफस’च्या दहशतीचे वातावरण आहे. राज्य सरकार व आरोग्य विभागाने २०१२ पासूनच याच्या जनजागृतीची मोहीम राबवली असती व उपाययोजना केल्या असत्या तर हा रोग पसरला नसता, लोकांचे जीव वाचले असते, असे बोलले जात आहे.

ठळक मुद्देसहा वर्षानंतरही तपासणीच्या सोर्इंचा अभाव

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह बाजूच्या राज्यात वाढत असलेल्या ‘स्क्रब टायफस’च्या दहशतीचे वातावरण आहे. या रोगाने अनेक लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. काहींचा मृत्यूही झाला आहे. जर राज्य सरकार व आरोग्य विभागाने २०१२ पासूनच याच्या जनजागृतीची मोहीम राबवली असती व उपाययोजना केल्या असत्या तर हा रोग पसरला नसता, लोकांचे जीव वाचले असते, असे बोलले जात आहे.‘स्क्रब टायफस’चे पहिले प्रकरण आॅक्टोबर २०१२ मध्ये समोर आले. काटोल येथील कोलू गावातील कुसुम वानखेडे या महिलेला हा रोग झालाहोता. उपचारानंतर ही महिला बरी झाली होती. परंतु त्या नंतर या रोगाला घेऊन सामान्यांना माहिती देण्यासाठी जनजागृतीच झाली नाही. धक्कादायक म्हणाजे, स्क्रब टायफसच्या निदानासाठी आवश्यक ‘पीसीआर’सह आणखी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले नाही. परिणामी, सहा वर्षांत या रोगाचा प्रकोप वाढला. सूत्रानुसार, यापूर्वीही या रोगाचे रुग्ण आढळून येत होते, काहींचा मृत्यूही झाला. परंतु प्रकरण समोर आले नसल्याने उपाययोजनाही झाल्या नाहीत. ‘लोकमत’ने पहिल्यांदा हे प्रकरण समोर आणल्याने उपाययोजनांना आता कुठे सुरूवात झाली.

कोमामध्ये होती कुसुम८ आॅक्टोबर २०१२ रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गंभीर अवस्थेत कुसुम वानखेडे यांना उपचारासाठी आणले. त्या कोमात होत्या. उपचारादरम्यान त्यांचे रक्त नमूने घेऊन डेंग्यू, मलेरिया, मेंदूज्वर व व्हायरल तापाची तपासणी करण्यात आली. परंतु या रोगाचे लक्षण दिसून आले नव्हते. नंतर मेयोच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत जोशी यांनी उपचारादरम्यान कुसुमच्या छातीवर एक व्रण दिसला. त्यावरून ‘स्क्रब टायफस’ची शंका निर्माण झाली. नंतर रक्ताचे नमूने दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) पाठविण्यात आले. १९ आॅक्टोबर २०१२ रोजी आलेल्या अहवालात ‘स्क्रब टायफस’ असल्याचे निदान झाले.२०१२ मध्ये प्रसिद्ध केले होते वृत्त‘स्क्रब टायफस’चे निदान झाल्यानंतर २३ आॅक्टोबर २०१२ रोजी ‘लोकमत’ने ‘गवतावर संभाळून चला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून रोगाची माहिती दिली होती. त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले होते, उपचाराच्या सोई उपलब्ध करून दिल्या जात आहेत, रोगाला घेऊन जागरुक केले जात आहे.

 

 

टॅग्स :Healthआरोग्य