स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला कात्री
By Admin | Updated: March 15, 2017 02:22 IST2017-03-15T02:22:37+5:302017-03-15T02:22:37+5:30
महापालिकेचा २०१६-१७ या वर्षाचा २०४८ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बंडू राऊ त यांनी सादर केला होता.

स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला कात्री
आयुक्तांचा अर्थसंकल्प १८ मार्चला : ३० टक्के कपातीचे संके त
नागपूर : महापालिकेचा २०१६-१७ या वर्षाचा २०४८ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बंडू राऊ त यांनी सादर केला होता. परंतु गेल्या ११ महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत १०४२ कोटींचाच महसूल जमा झाला. अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत निम्माच महसूल जमा झाला. उत्पन्नाचा विचार करता आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सुधारित अर्थसंकल्पात स्थायी समितीच्या प्रस्तावित खर्चाला ३० टक्के कात्री लागणार असल्याचे संकेत आहेत.
१८ मार्चला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त २०१६-१७ या वर्षाचा सुधारित तर २०१७-१८ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नियमानुसार दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात हा अर्थसंकल्प सादर केला जातो. परंतु महापालिका निवडणुकीमुळे यावेळी विलंब झाला आहे. वित्त वर्ष संपण्याला १६ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.