पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या वैज्ञानिक....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST2021-03-08T04:08:21+5:302021-03-08T04:08:21+5:30

दिवाळी उत्सवावर निर्बंध न घालता फटाक्यांमुळे हाेणारे प्रदूषण राेखण्यासाठी पर्यावरणपूरक ग्रीन फटाक्यांची निर्मिती करून देशभर चर्चेत आलेले नाव म्हणजे ...

Scientists working for environmental conservation .... | पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या वैज्ञानिक....

पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या वैज्ञानिक....

दिवाळी उत्सवावर निर्बंध न घालता फटाक्यांमुळे हाेणारे प्रदूषण राेखण्यासाठी पर्यावरणपूरक ग्रीन फटाक्यांची निर्मिती करून देशभर चर्चेत आलेले नाव म्हणजे डाॅ. साधना रायलू हाेय. डाॅ. साधना या नीरीमध्ये एनव्हायर्नमेंट मटेरियल डिव्हिजनच्या प्रमुख असून वायू, जल व घन पदार्थांचे प्रदूषण राेखण्यासाठी मटेरियलबाबत संशाेधन करणे हे त्यांचे काम. त्यांनी विज्ञान संस्था येथून रसायनशास्त्रात एमएस.सी. केल्यानंतर नीरीमधूनच पीएच.डी. प्राप्त केली. त्यानंतर रिसर्च फेलाे म्हणून नीरीमध्येच कार्य सुरू केले व पुढे १९८९ मध्ये कायमस्वरुपी रुजू झाल्या. ग्रीन फायर क्रॅकर्स हे उल्लेखनीय संशाेधन असले तरी साैर शेगडी, साेलर हायड्राेजन प्राेजेक्टमध्ये विशेष संशाेधन त्यांनी केले आहे. आपल्या ३३ वर्षाच्या सेवेत १८० प्रबंध सादर करीत विविध संशाेधनासाठी ४० पेटेंट नावावर केले आहेत. साैर ऊर्जेच्या उपयाेगाने पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याचा प्रकल्पही महत्त्वपूर्ण आहे. सॅनिटरी नॅपकिन्सच्या प्रदूषणाची माेठी समस्या जगाला भेडासावत असताना प्रदूषण न हाेता ते ज्वलन करणारे यंत्र विकसित करण्याचे माेठे याेगदान त्यांनी दिले आहे. शिवाय प्रदूषणमुक्त सॅनिटरी पॅड बनविण्याचा प्रकल्प प्रगती पथावर आहे. काेराेना काळात तयार केलेले मास्कही चर्चेत आहेत.

Web Title: Scientists working for environmental conservation ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.