शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

शाळा सुरू, पण सुरक्षा धोक्यात! नागपुरात १६१ स्कूल व्हेईकल्सवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:03 IST

दीडशेवर बस, व्हॅन्स, ऑटोंवर कारवाई : अनेक ठिकाणी अतिरिक्त विद्यार्थी बसवून वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळेचे नवीन सत्र सुरू झाल्यानंतर नागपुरातील रस्त्यांवर परत विद्यार्थ्यांनी भरलेल्या 'स्कूल बस' व 'व्हॅन्स' दिसू लागल्या आहे. अनेकांकडून मनमानी पद्धतीने कारभार करण्यात येत असून, नियमांचे पालन न करणाऱ्या दीडशेहून अधिक बस, व्हॅन्स व ऑटोचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. अनेक स्कूल बस व व्हॅन्समध्ये, तर अतिरिक्त विद्यार्थी बसवून बेदरकारपणे वाहतूक सुरू असल्याची बाब निदर्शनास आली.

२३ तारखेपासून नागपुरात अनेक शाळांना सुरुवात झाली, तर मंगळवारपासून बहुतांश शाळा सुरू झाल्या. स्कूल बस, व्हॅन्स किंवा ऑटोद्वारे अनेक विद्यार्थी शाळेत जातात. लहान मुले असल्याने चालकांनी प्रत्येक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.

मात्र, अनेक चालक नियमांचे पालनच करत नसल्याचे वारंवार दिसून येते. हीच बाब लक्षात घेऊन नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाने मंगळवारी शहरात मोहीमच राबविली. यात अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविल्याचे आढळून आले, तर बरेच चालक विना गणवेश वाहने चालवत होते. काही अतिआगाऊ चालकांकडून सिटबेल्ट न लावताच वाहन चालविण्यात येत होता, तर काही वाहनचालक, तर चक्क चौकांतील सिग्नल तोडून वाहने दामटून विद्यार्थ्यांचा जीवच धोक्यात घालताना दिसून आले. काही व्हॅनचालकांकडे फिटनेस प्रमाणपत्र तसेच इतर दस्तावेज नव्हते. पोलिसांनी दिवसभरात विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या १६१ वाहनचालकांवर कारवाई केली.

नियम पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जास्कूलबस व व्हॅन्स, तसेच ऑटोमध्ये लहान मुले दाटीवाटीने बसविण्यात येतात. सिग्नल न पाळता वाहने चालविणे म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. स्कूल बस, व्हॅन, तसेच ऑटोविरोधात पोलिसांची विशेष मोहीम सुरूच राहणार आहे. त्यामुळे कुणी नियम तोडला, तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्कूल बसवर सर्वाधिक कारवाईदिवसभरात पोलिसांनी केलेल्या पाहणीत स्कूलबसकडूनच सर्वाधिक नियमभंग करण्यात येत असल्याचे दिसून आले. १०६ स्कूल बसवर कारवाई करण्यात आली, तर नियम तोडणाऱ्या २६ स्कूल व्हॅन्सदेखील आढळल्या. याशिवाय २९ ऑटोचालकांवरदेखील पोलिसांकडून कारवाई झाली.

टॅग्स :nagpurनागपूर