शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाही : शिक्षणमंत्री शेलार यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:30 IST

जिल्हा परिषदेच्या ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. शिक्षण सचिवांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करण्यासंदर्भात विचार केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ३८७ शाळा बंद होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार, रामदास आंबटकर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, या शाळा बंद करण्याचा शासनाचा विचार नाही. पण पटसंख्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी सत्यशोधन समिती गठित करण्यात येईल, असेही सांगितले.

ठळक मुद्देसत्यशोधन समिती गठित करण्यात येईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. शिक्षण सचिवांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करण्यासंदर्भात विचार केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ३८७ शाळा बंद होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार, रामदास आंबटकर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, या शाळा बंद करण्याचा शासनाचा विचार नाही. पण पटसंख्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी सत्यशोधन समिती गठित करण्यात येईल, असेही सांगितले.राज्यातील मराठी शाळेतील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार शासनाकडून होत आहे. नागपूर जिल्ह्यात ३८७ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या असून, १ ते ५ पटसंख्येच्या ३४ शाळा आहे. लोकमतने सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते. या सर्व शाळा मराठी माध्यमाच्या असल्याने, शहरातील काही संस्थांनी मराठी शाळा बंद पाडण्याच्या शासन धोरणाला विरोध केला होता. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. कमी पटसंख्येच्या संदर्भात विविध मुद्दे उपस्थित करून, शासनाने शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचा उल्लेख केला होता.यासंदर्भात उत्तर देताना शेलार म्हणाले की, गेल्यावर्षी शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १२९२ शाळेचे समायोजन नजीकच्या शळेत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पण काही भौगोलिक कारणाने अडचणी येत असल्याचे लक्षात आल्याने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्थानिक पडताळणी करून समायोजन करावे, अशा सूचना दिल्या होत्या. गेल्यावर्षी ३९१ शाळांचे समायोजन करण्यात आले. यावर्षी राज्यात १३५४४ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहे. तर ४७४९ शाळा १० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी