शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
9
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
10
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
11
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी उघड; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना केली अटक
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
13
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
14
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
15
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
16
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
17
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
18
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
19
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
20
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार

नागपुरातील शाळांमध्ये शुकशुकाट, कोचिंग क्लासेसही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:22 AM

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व शाळा-महाविद्यालये, कोचिंंग क्लासेसना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट होता.

ठळक मुद्देकोरोनाच्या सुट्यांचा परिणामविविध भागांतील गार्डन मात्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व शाळा-महाविद्यालये, कोचिंंग क्लासेसना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट होता. आरोग्य विभागातर्फे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले. तरीही उद्याने गर्दीने फुलली होती.शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा आदेश शनिवारी जारी करण्यात आला होता. त्यामुळे बहुतांश शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सोमवारपासून सुटी असल्याचे कळविले होते. काही शाळांचा विद्यार्थ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळेत आले. शाळेला सुटी जाहीर करण्यात आल्याचे शिक्षकांनी सांगितल्यानंतर विद्यार्थी आल्यापावली परत गेले. हुडकेश्वर मार्गावरील एका शाळेत दहावीचा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी होती. धनगवळी नगरातील एका प्ले ग्रुप ते केजी टू पर्यंत असलेल्या कॉन्व्हेंटने विद्यार्थ्यांना सुटी असल्याचे कळविले नव्हते. त्यामुळे या कॉन्व्हेंटमध्ये पालक आपल्या चिमुकल्यांना सोडण्यासाठी येताना दिसले. मानेवाडा रिंग रोडवरील एका शाळेत सुटीची कल्पना नसल्यामुळे विद्यार्थी शाळेत आले, परंतु सुटी असल्याचे कळताच ते आपल्या घरी निघून गेले. नंदनवनमधील बहुतांश कोचिंग क्लासेस रविवारपासून बंद असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाने सांगितले.तर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या एका कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकविणे सुरु होते. तेथील संचालकांना विचारणा केली असता त्यांनी शनिवारी उशिरा आदेश मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना कळविणे शक्य झाले नाही असे सांगितले. दुपारपासून आम्हीही क्लास बंद करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भांडेप्लॉट चौक, नवीन सुभेदार ले आऊट परिसरातील कोचिंग क्लासेसही बंद असल्याचे चित्र दिसले.

गार्डनमध्ये नागरिकांची गर्दीशहरातील बहुतांश गार्डन सुरू असल्याचे चित्र सोमवारी दिसले. सुभेदार ले आऊट परिसिरातील दत्तात्रयनगर येथील उद्यानात सकाळी नागरिक आले होते. परंतु नेहमीपेक्षा नागरिकांची संख्या खूप कमी होती. धंतोलीतील ट्राफिक पार्कमध्येही पालक आपल्या मुलांना घेऊन आल्याचे चित्र दिसले. शंकरनगरमधील उद्यानातही तरुण, ज्येष्ठ नागरिक आले होते. रामदासपेठच्या दगडी पार्कमध्येही नागरिक आले होते.

काही मॉल बंदशहरातील मॉल, सिनेमा थिएटरसुद्धा बंद ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या निर्देशाचे पालन थिएटर चालक करीत आहेत. काही मॉलही बंद ठेवण्यात आले आहे. पण काही मॉल चालकांनी शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे सोमवारी दिसून आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे.

विद्यापीठ, वसतिगृहात ‘नो एन्ट्री’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्रशासकीय इमारत परिसर, तसेच वसतिगृहांत अभ्यागतांना ‘नो एन्ट्री’ करण्यात आली आहे. यासंदर्भात जागोजागी सूचना फलक लावण्यात आले आहेत. ‘कोरोना’च्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठातील नवीन व जुना प्रशासकीय परिसर तसेच सर्व वसतिगृहे, अमरावती मार्गावरील शैक्षणिक परिसर येथे सर्व ठिकाणी अभ्यागतांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शिवाय सोमवारी ‘कॅम्पस’मध्ये विद्यार्थ्यांनादेखील आत सोडण्यात आले नाही. ३१ मार्चपर्यंत कुणीही येऊ नये असे सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यापीठाच्या निर्णयाची माहिती दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस