शाळा सुरू होत आहे, आरटीईची प्रतिपुर्ती तर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST2021-02-05T04:50:57+5:302021-02-05T04:50:57+5:30
नागपूर : राज्य शासनाने आता पाचव्या वर्गापासून शाळा सुरू केल्या आहेत. शाळा सुरू करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोनाच्या सर्व ...

शाळा सुरू होत आहे, आरटीईची प्रतिपुर्ती तर द्या
नागपूर : राज्य शासनाने आता पाचव्या वर्गापासून शाळा सुरू केल्या आहेत. शाळा सुरू करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोनाच्या सर्व उपाययोजना शाळांना करायच्या आहेत. पालकांनी गेल्यावर्षीपासून फी न भरल्यामुळे विना अनुदानित शाळांचे कंबरडे मोडले आहे. शाळांचा आरटीईचा हक्काचा निधी चार वर्षांपासून थकीत आहे. शाळा सुरू होत असताना आरटीईची थकीत प्रतिपूर्ती तरी करा, अशी मागणी विना अनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.
कोरोनामळे इंग्रजी शाळा मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. शाळेवर अवलंबून असणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पालकांनी शाळा बंद असल्यामुळे फी भरलेली नाही. शासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहे. ८ फेब्रुवारीपासून महापालिकेच्या हद्दीतील ५ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. कोरोनाच्या बाबतीत शासनाच्या असलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शाळांना सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. हा खर्च करणे, अतिरिक्त मनुष्यबळ वाढविणे शाळांना अवघड होणार आहे. राज्य शासनाने या शाळांचे २०१७-१८ या वर्षापासून आरटीईची प्रतिपूर्ती दिलेली नाही. शासनाने थकीत प्रतिपूर्ती लगेच दिल्यास शाळांना दिलासा मिळेल. त्यामुळे आरटीई फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन काळबांडे, राम वंजारी, अर्चना ढबाले यांनी प्रतिपूर्ती मिळण्यासाठी शिक्षण उपसंचालकांकडे मागणी केली आहे.