शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलाचे अपहरण

By admin | Updated: January 8, 2016 03:34 IST

१४ वर्षाच्या शाळकरी मुलाचे मनीषनगरातून अपहरण झाल्यामुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे.

नागपूर : १४ वर्षाच्या शाळकरी मुलाचे मनीषनगरातून अपहरण झाल्यामुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे. चैतन्य सुभाष आष्टनकर असे अपहृत मुलाचे नाव आहे. तो मनीषनगरातील पॉप्युलर सोसायटीतील रहिवासी आहे. चैतन्यच्या आई सुनंदा (वय ४८) आणि वडील सुभाष (वय ५३) दोघेही शिक्षक आहेत. त्याला गायत्री (वय २१) आणि हर्षदा (वय १९) या दोन बहिणी आहेत. जामठा फाटा जवळच्या माऊंटफोर्ट स्कूलमध्ये आठवीत शिकणारा चैतन्य रोज सकाळी ६.४५ ला स्कूलबसने शाळेत जातो आणि २.३० ते ३ च्या दरम्यान बसनेच घरी परततो. नेहमीप्रमाणे आज दुपारी २.४० ला तो बेलतरोडीच्या बँक आॅफ बिकानेर शाखेजवळ बसमधून मित्रासह उतरला. पाच मिनिटांच्या अंतरावर त्याचे निवासस्थान असल्याने तो तेथून घराजवळ आला. अचानक सिल्वर कलरची मारूती इको कार आली. त्यातील एक पांढरा शर्ट घातलेला आरोपी उतरला आणि नवनीत डेकोरेशनच्या फलकाजवळून त्याने चैतन्यला कारमध्ये कोंबले. लगेच ही कार सुसाट वेगाने पुढे निघाली. अवघ्या दोन मिनिटातच अपहरणकर्त्यांनी डाव साधला. चैतन्यसोबत घराकडे निघालेला अन २०० फूट अंतरावर असलेल्या मित्राने हा प्रकार बघितला. चैतन्यचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच हादरलेला तो मुलगा धावतच स्वत:च्या घरी गेला. त्याने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्याच्या आईने लगेच गायत्रीला (चैतन्यची बहीण) तर गायत्रीने सुनंदा आष्टनकर यांना फोन करून हा प्रकार सांगितला. सुनंदा यांनी त्यांचे पती सुभाष यांना ही माहिती कळविली. त्यानंतर सुभाष आष्टनकर आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींसह सोनेगाव पोलीस ठाण्यात पोहचले. शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार मिळताच पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली. (प्रतिनिधी)अपहरणकर्ते आणि कारण गुलदस्त्यातमाहिती कळताच परिमंडळ - १ चे उपायुक्त शैलेष बलकवडे सोनेगाव ठाण्यात पोहचले. त्यांनी चैतन्यच्या परिवारातील सदस्यांकडून बारीकसारीक माहिती मिळवत या अपहरणामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आष्टनकर परिवार मूळचा गुमगाव (हिंगणा) परिसरातील रहिवासी असून, पती-पत्नी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत शाळेत (घराबाहेर) असतात. चैतन्यसुद्धा सालस स्वभावाचा असून, आपले कुणाशी वैर नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. कुणावरही शंका नसल्याचे त्यांनी म्हटले. अपहरणाची घटना घडून ५ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अपहरणकर्ते किंवा त्यांच्या साथीदारांपैकी कुणाचाच आष्टनकर परिवारात फोन आला नाही. यामुळे या प्रकरणातील अपहरणकर्त्यांसोबतच अपहरणाचे कारणही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, खंडणीसाठीच हे अपहरण करण्यात आले असावे, असा अंदाज आहे. त्यांनी चैतन्यची आधी माहिती काढूनच त्याचे अपहरण केले असावे, असा कयास पोलिसांनी लावला आहे. दहा पथकांकडून तपासगेल्या पाच वर्षांत शहरात घडलेल्या कुश कटारिया, युग चांडक आणि विक्की बोरकर अपहरण आणि हत्याकांडाची तसेच गेल्या महिन्यात जरीपटक्यातील बहीण भावाचे अपहरण आणि हत्या प्रकरणाने उपराजधानीकरांच्या मनात प्रचंड दहशत आहे. त्यामुळे चैतन्यचे अपहरण झाल्याने त्याचे कुटुंबीय आणि आप्तस्वकियच नव्हे तर नागपूरकरांसह पोलीसही हादरले आहेत. त्याचा तातडीने शोध घेण्यासाठी गुन्हेशाखेसह अन्य पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कामी लावण्यात आले आहे. पोलिसांची दहा पथके चैतन्य आणि त्याचे अपहरण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.