शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडी घोटाळा : मुख्याध्यापकाविरोधात तक्रार करणारा संस्थाचालकच अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:32 IST

Nagpur : एसआयटीच्या चौकशीत अडकला, ४८ शिक्षकांचा बनावट शालार्थ आयडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटीला आणखी एक यश मिळाले आहे. तब्बल ४८ शिक्षकांच्या नावाने बनावट शालार्थ आयडी तयार करणाऱ्या संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित संस्थाचालकाने त्याच्या शिक्षण संस्थेचे बनावट लेटरहेड वापरून अपात्र मुख्याध्यापक पराग पुडकेने पद मिळविल्याची तक्रार केली होती. आता त्याच्यावरच हे प्रकरण उलटले असून, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ओंकार भाऊराव अंजीकर (वय ४६, बाळाभाऊपेठ) असे अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकाचे नाव आहे. अंजीकरची शांतिनिकेतन शैक्षणिक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत गुलशननगर येथील जय हिंद विद्यालय, एस.के.बी. हायस्कूल यांच्यासह तीन शाळा चालविल्या जातात. २०१९ पासून अंजीकरा यांनी सुमारे ३० शिक्षकांचे शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. त्यासाठी त्याने शिक्षकांकडून (पान १ वरुन) पैसे घेतले. नंतर, प्रत्येक

शिक्षकाकडून त्यांचे थकीत वेतन मिळावे यासाठी १० लाख रुपयेही घेतले. वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे याच्या मदतीने अंजीकरने बनावट शालार्थ आयडी तयार केले. जेव्हा सायबर पोलिसांनी बनावट आयडींची चौकशी सुरू केली तेव्हा अंजीकरच्या शाळेत हे ३० व अगोदरचे १८ असे ४८ बनावट शालार्थ आयडी तयार झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी सापळा रचून सोमवारी रात्री अंजीकरला केली. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंजीकर हा या घोटाळ्यात अटक झालेला चौथा शाळा संचालक आहे. याअगोदर चरण चेटुले, राजू मेश्राम व दिलीप धोटे या तिघांना अटक करण्यात आली होती.

पराग पुडकेविरोधात अंजीकरने केली होती तक्रारअपात्र असूनदेखील बनावट दस्तऐवजांचा वापर करून मुख्याध्यापक पद मिळविणाऱ्या पराग पुडकेला एप्रिल महिन्यात सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली होती. त्याची ओंकार अंजीकरनेच सर्वात अगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली होती. पुडकेने अंजीकरच्याच एस. के. बी. हायस्कूल येथे १ ऑगस्ट २०१७ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत कार्यरत असल्याचे अनुभव प्रमाणपत्रदेखील तयार करून दिले होते. त्यावर मुख्याध्यापिकेची बोगस स्वाक्षरीदेखील होती. अंजीकरने ऑगस्ट २०२३ मध्येच उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली होती. आता शिक्षणक्षेत्राशी निगडित दुसऱ्या मोठ्चा घोटाळ्यात स्वतः अंजीकर अडकल्याने आणखी मोठ्या लिंक समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर