लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तडीपार गुंडाने शाळकरी मुलीला (१३) आपल्या दुचाकीवर बसवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी बुधवारी अजनी पोलिसांनी कुख्यात प्रवीण मोहन बक्सरे (२६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मुलीने तिच्या पालकांना आणि नंतर अजनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ४ आॅगस्टला सकाळी ११.३० वाजता पीडित मुलगी शाळा आटोपून घराकडे येत होती. शेजारी राहणारा कुख्यात गुंड आरोपी प्रवीण बक्सरे याने तिला आपल्या अॅक्टिव्हावर बसवले. तिला वाडीतील मित्राच्या रूमवर नेले आणि तेथे तिच्यावर पहाटे २.४५ पर्यंत अनेकदा बलात्कार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारेन अशी धमकी दिल्याने मुलगी गप्प बसली. मात्र, तिला तिच्या पालकांनी खोदून खोदून विचारले तेव्हा तिने आपबिती सांगितली. पालकांनी तिला अजनी ठाण्यात नेले. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार तसेच जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
नागपुरात तडीपार गुंडाचा शाळकरी मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:30 IST
तडीपार गुंडाने शाळकरी मुलीला (१३) आपल्या दुचाकीवर बसवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी बुधवारी अजनी पोलिसांनी कुख्यात प्रवीण मोहन बक्सरे (२६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात तडीपार गुंडाचा शाळकरी मुलीवर बलात्कार
ठळक मुद्दे११ दिवसानंतर उघड : अजनीत गुन्हा दाखल