शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नागपुरात पित्यानेच केला शाळकरी मुलीवर चार वर्षांपासून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:36 PM

चार वर्षांपासून एका शाळकरी मुलीचे शोषण करणाऱ्या नराधम पित्याला गिट्टीखदान पोलिसांनी बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.

ठळक मुद्देगिट्टीखदानमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार वर्षांपासून एका शाळकरी मुलीचे शोषण करणाऱ्या नराधम पित्याला गिट्टीखदान पोलिसांनी बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. किशोर कमलाकर पाटील (वय ४५) असे या आरोपीचे नाव असून तो एका शाळेत शिपायी म्हणून नोकरी करतो. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गिट्टीखदान परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.पीडित मुलगी सध्या १३ वर्षांची असून, ती ९ वीत शिकते. मुलीची आई नोकरी करते. तिला एक छोटी बहीण आहे. तिची आई कर्तव्यावर गेल्यानंतर आरोपी पाटील बालिकेचे लैंगिक शोषण करायचा. २० जानेवारी २०१३ ला त्याने सर्वप्रथम कुकर्म केले. त्यावेळी त्याने बालिकेला धमकी देऊन आईला हा प्रकार सांगितल्यास जीवे ठार मारेन, असा धाक दाखवला. त्यामुळे बालिका गप्प राहिली.एक दिवस असह्य त्रास झाल्याने तिने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्यामुळे आईने आरोपीला विचारणा केली असता त्याने चक्क नकार दिला. एवढेच नव्हे तर बालिकेला बेदम मारहाण करून आईजवळ सांगितलेला प्रकार खोटा आहे, असे सांगण्यास बाध्य केले. परिणामी मुलीने आपल्या आईला असे काही नाही, असे सांगितले. त्यावेळी आईने तिला ‘ऐसी बाते गंदी बच्चीयां करती है. आप फिरसे ऐसी बाते मत करना‘,असे समजावून सांगितले. त्यावेळपासून बालिका दहशतीत आली. इकडे आरोपी निर्ढावला. तो संधी मिळेल तेव्हा बालिकेचे शोषण करायचा. तब्बल पाच वर्षांपासून त्याचा अत्याचार सहन करणाऱ्या बालिकेची मानसिक स्थिती त्यामुळे बिघडली.

अशी फुटली कोंडीघरात अन् शाळेत ती गप्प राहायची. कुणाशीच जास्त बोलत नव्हती. आईला खरा प्रकार सांगितला तर ती विश्वास ठेवणार नाही, याची तिला जाणीव होती. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याने ती वैफल्यात गेली. ती एकांतात घरी स्वत:च्या हातावर ब्लेडने चिरे मारून घेत होती. तिच्या वर्गमैत्रिणींच्या लक्षात तिची स्थिती आल्याने त्यांनी तिला बोलते केले. त्यानंतर या संतापजनक प्रकाराला वाचा फुटली. मैत्रिणींनी वर्गशिक्षिकेला आणि वर्गशिक्षिकेने प्राचार्यांना ही माहिती दिली.

शाळा प्रशासनाची तत्परताप्राचार्यांनी या गंभीर प्रकाराची तत्परतेने दखल घेत मुलीच्या आईला बोलवून घेतले. त्यांना विश्वासात घेत सर्व गैरप्रकार सांगितला. हा घटनाक्रम ऐकून आईचीही मानसिक अवस्था बिघडली. इकडे अत्याचारित मुलगी आणि तिकडे पती आरोपी असल्याने काय करावे, हे तिला सुचेनासे झाले. दोन्ही मायलेकींना डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचारासोबतच या दोघींचे समुपदेशन केले. त्यानंतर आरोपीला रंगेहात पकडण्याची योजना बनविण्यात आली.

नराधम पकडला गेला१७ डिसेंबरला आई कर्तव्यावर जाते असे सांगून घरातच लपून बसली. मुलीची आई कर्तव्यावर गेल्याचा अंदाज बांधून नराधम पाटीलने बालिकेसोबत कुकर्म करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आईने तेथे जाऊन त्याचे थोबाड रंगविले. त्यानंतर तो पळून गेला. शाळा प्रशासनाने हे प्रकरण बालकल्याण समितीकडे नेले. बालकल्याण समितीने चौकशी केल्यानंतर शनिवारी रात्री गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक शालिनी किन्नाके यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे, तिला धमकी देणे आदी आरोपाखाली पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याला रविवारी पहाटे अटक करण्यात आली. न्यायालयात हजर करून त्याचा २४ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला.

टॅग्स :Rapeबलात्कार