शाळकरी मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: February 24, 2017 03:06 IST2017-02-24T03:06:07+5:302017-02-24T03:06:07+5:30

एका शाळकरी मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपीच्या जावयाने पीडित मुलीच्या नातेवाईकांना मारण्याची धमकी दिली.

School girl raped | शाळकरी मुलीवर बलात्कार

शाळकरी मुलीवर बलात्कार

आरोपीची धमकी : धंतोलीत गुन्हा दाखल
नागपूर : एका शाळकरी मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपीच्या जावयाने पीडित मुलीच्या नातेवाईकांना मारण्याची धमकी दिली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही संतापजनक घटना घडली.
पीडित मुलगी (वय १४) आणि आरोपी (वय १७) आजूबाजूला राहतात. बुधवारी रात्री पीडित मुलीचे नातेवाईक बाहेर गेले होते. मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून आरोपी तिच्या घरात शिरला. त्याने तिला आणि नातेवाईकांना मारण्याची धमकी देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. आई-वडील घरी आल्यानंतर पीडित मुलीने त्यांना अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी आरोपीला विचारणा केली असता आरोपीचा जावई भास्कर महालिंगम नायडू (वय ३८) याने पीडित मुलगी व तिच्या पालकांना अश्लील शिवीगाळ केली. आपल्या मेव्हण्याने केले ते चांगले केले, असे म्हणत आरोपी नायडूने या प्रकरणाची तक्रार दिल्यास गंभीर परिणामाची धमकी दिली. त्यामुळे पीडित परिवाराने धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक जी. एच. कागणे यांनी आरोपीविरुद्ध कलम बलात्कार, धमकी तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: School girl raped