स्कार्फने केला घात, घडला थरार

By Admin | Updated: June 3, 2015 02:30 IST2015-06-03T02:30:18+5:302015-06-03T02:30:18+5:30

प्रत्यक्ष खुनाच्या एक दिवसअगोदर १० मार्च रोजी कुणाल आणि प्रदीप हे नंदनवन येथील वसतिगृहानजीकच्या एका कॅफेत थांबले होते.

Scarf, Thunderstorm | स्कार्फने केला घात, घडला थरार

स्कार्फने केला घात, घडला थरार

नागपूर : प्रत्यक्ष खुनाच्या एक दिवसअगोदर १० मार्च रोजी कुणाल आणि प्रदीप हे नंदनवन येथील वसतिगृहानजीकच्या एका कॅफेत थांबले होते. मारेकऱ्यांना कुणालच्या प्रेयसीला तिच्याच मैत्रिणीच्या मार्फत दाखवण्यात आले होते. घटनेच्या दिवशी कुणालची प्रेयसी वसतिगृहातून बाहेर पडल्याची माहिती मैत्रिणीने कुणालला दिली होती. लागलीच मारेकऱ्यांनी मोटरसायकलींनी पाठलाग सुरू केला होता.
ती कुणालची प्रेयसी नव्हती तर तिच्यासारखी दिसणारी निष्पाप मोनिका किरणापुरे होती. कॉलेजचा गणवेश घालून आणि कुणालच्या प्रेयसीच्या स्कार्फने चेहरा झाकून ती वसतिगृहाकडून आपल्या महाविद्यालयाकडे जाण्यास निघाली होती. अचानक मारेकऱ्यांनी तिच्यावर तीक्ष्ण व धारदार शस्त्रांचे दहा घाव घातले होते. तीक्ष्ण व धारदार जांबिया तिच्या पाठीत भोसकण्यात आला होता. मोनिका आरडाओरड करीत खाली कोसळली तेव्हा तो तसाच पाठीत रुतलेला होता. खून केल्यानंतर लागलीच सर्व आरोपी काटोल येथे पळून गेले होते. कुणालने बँकेतून १ लाख २० हजाराचे कर्ज घेऊन या मारेकऱ्यांना सुपारीची रक्कम दिली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव गिरी यांनी केला. या खटल्यात आतापर्यंत ३१ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम तर आरोपींच्यावतीने अ‍ॅड. सुदीप जयस्वाल आणि अ‍ॅड. नितीन हिवसे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल किशोर सातोरकर आणि नायक पोलीस अनिल दोनाडकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.

Web Title: Scarf, Thunderstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.