यंत्रणा कोलमडल्याने टंचाई

By Admin | Updated: June 10, 2014 01:15 IST2014-06-10T01:15:45+5:302014-06-10T01:15:45+5:30

शहराला दररोज ६४0 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स (ओसीडब्ल्यू)ची पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडल्याने शहरातील सर्व झोनमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Scarcity due to the system collapsing | यंत्रणा कोलमडल्याने टंचाई

यंत्रणा कोलमडल्याने टंचाई

महापालिका : तातडीने आढावा घेण्याची समिती अध्यक्षांची मागणी
नागपूर : शहराला दररोज ६४0 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स (ओसीडब्ल्यू)ची पाणीपुरवठा यंत्रणा  कोलमडल्याने शहरातील सर्व झोनमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पारा चढला असतानाच लोकांना पाणी मिळत  नसल्याने परिस्थिती स्फोटक  होण्याची  शक्यता आहे.
शहरातील पाणीटंचाईवर तातडीने तोडगा काढण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्याची मागणी आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडे केली आहे.  तसेच महापौर, स्थायी समिती अध्यक्षांनाही यासंदर्भात पत्र दिल्याची माहिती जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत  दिली.
शहरातील जलकुंभात आवश्यक असलेला जलसाठा होत नाही. त्यामुळे नेटवर्कच्या टोकावरील वस्त्यांना पाणी मिळत नाही. जलकुंभ भरण्याचे  वेळापत्रक कोलमडले आहे. व्हॉल्व ऑपरेट करण्यावर ओसीडब्ल्यूचे नियंत्रण नसल्यामुळे टाकीत पुरेसा पाणीसाठा होत नाही. त्यामुळे गंभीर समस्या  निर्माण झाली आहे.
टंचाईग्रस्त भागातील नागरिक नगरसेवकांकडे टँकरची मागणी करतात. परंतु ओसीडब्ल्यूचे अधिकारी टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत नाही. त्यातच  टाकीवरून निघालेले टँकर टंचाईग्रस्त भागात पोहोचत नाही. ज्या झोनमध्ये २५ फेर्‍यांची गरज असेल तिथे १५ फेर्‍या होत असल्याच्या तक्रारी आहेत.
लक्ष्मीनगर झोनमध्ये गेल्या १५ दिवसांपासून पाण्याची समस्या आहे. टँकरची मागणी करूनही मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. यासंदर्भात  सोमवारी झोनधील नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, प्रकाश तोतवानी, मुन्ना यादव व सभापती गोपाल बोहरे यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला  ओसीडब्ल्यूचे प्रमुख अधिकारी आले नाही. याची आयुक्तांकडे तक्र ार केल्यानंतर अधिकारी आले. झोनमध्ये १0 टँकरची मागणी असताना ५ टँकर  उपलब्ध केले आहे.
 त्यामुळे लोकांना पाणी मिळत नसल्याचे गोपाल बोहरे यांनी निदर्शनास आणले.
टंचाईमुळे काही जलकुंभावर परिस्थिती स्फोटक बनली आहे. पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी केल्याचे बोहरे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
 

Web Title: Scarcity due to the system collapsing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.