कुटुंबीयांना 'सॉरी' म्हणत त्याने लावला गळफास; उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 09:05 PM2021-10-18T21:05:35+5:302021-10-18T21:06:02+5:30

Nagpur News जावई, बहीण आणि मित्राला मोबाइलवर ‘सॉरी’ असा मेसेज पाठवून एका तरुणाने गळफास लावून घेतला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. चेतन यशवंत बिसेन (वय २८) असे त्याचे नाव आहे.

Saying ‘sorry’ to the family, he hung up; Suicide of a highly educated youth | कुटुंबीयांना 'सॉरी' म्हणत त्याने लावला गळफास; उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या

कुटुंबीयांना 'सॉरी' म्हणत त्याने लावला गळफास; उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देकारण अंधारात, कळमना पोलिसांकडून शोध

नागपूर - जावई, बहीण आणि मित्राला मोबाइलवर ‘सॉरी’ असा मेसेज पाठवून एका तरुणाने गळफास लावून घेतला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. चेतन यशवंत बिसेन (वय २८) असे त्याचे नाव आहे. (Saying ‘sorry’ to the family, he hung up; Suicide of a highly educated youth)

कळमन्यातील सुभान नगरात राहणारा बिसेन उच्चशिक्षीत होता. तो एका ट्रानस्पोर्ट कंपनीत कामाला होता. घरात आई आणि तो असे दोघेच राहायचे. त्याची विवाहित बहीण नागपुरातच राहते. घरची आर्थिक स्थितीही चांगली होती. मित्रांमध्ये तो नेहमी हसत खेळत वागायचा. रविवारी दुपारी त्याने त्याच्या आईला मंदिरात सोडून दिले. नंतर तो घरी परतला. त्याने त्याचे जावई, बहीण आणि मित्राला मोबाइलवर ‘सॉरी’ असा मेसेज पाठवला आणि गळफास घेतला.

दरम्यान, त्याची आई मंदिरातून परत आली तेव्हा त्यांना दार आतून लावून दिसले. आवाज देऊनही तो प्रतिसाद देत नसल्याने आईने बाजूच्या खिडकीतून बघितले असता चेतन बिसेन गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. आईने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. त्यानंतर शेजाऱ्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. चेतनला खाली उतरवले असता तो मृत असल्याचे उघड झाले. माहिती कळताच त्याचे जावई, बहीण आणि अन्य नातेवाईक पोहोचले. त्यानंतर चेतनने पाठविलेल्या सॉरीच्या मेसेजचा उलगडा झाला. चेतनची आई लिलावती यशवंत बिसेन (वय ५९) यांनी दिलेल्या सूचनेवरून कळमन्याचे पोलीस उपनिरीक्षक दहीफळे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. आर्थिक आणि काैटुंबिक स्थिती चांगली असताना चेतन बिसेनने आत्महत्या का केली, ते स्पष्ट झाले नाही. कळमना पोलीस तपास करीत आहेत.

वृद्ध आई एकाकी झाली

चेतनचे वडील यशवंत बिसेन यांचे कोरोनामुळे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे लिलावती यांचा चेतन एकमेव आधार होता. तरुण मुलाच्या आधाराने वृद्ध लिलावती दिवस ढकलत होत्या. आता त्यानेच कायमची साथ सोडल्याने त्या एकाकी अन् निशब्द झाल्या आहेत.

----

Web Title: Saying ‘sorry’ to the family, he hung up; Suicide of a highly educated youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू