साैर ऊर्जेच्या प्लेट पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:08 IST2021-03-27T04:08:55+5:302021-03-27T04:08:55+5:30

रामटेक : शेतात लावलेल्या साैर ऊर्जा संयंत्राच्या १५ प्लेट चाेरट्याने चाेरून नेल्या. या प्लेटची एकूण किंमत १ लाख ५० ...

Sawyer fled the plate of energy | साैर ऊर्जेच्या प्लेट पळविल्या

साैर ऊर्जेच्या प्लेट पळविल्या

रामटेक : शेतात लावलेल्या साैर ऊर्जा संयंत्राच्या १५ प्लेट चाेरट्याने चाेरून नेल्या. या प्लेटची एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधाळा (कवडक) शिवारात गुरुवारी (दि. २५) दुपारी घडली.

हरिश्चंद्र शामराव मेहरकुळे (५६, रा. दुधाळा कवडक, ता. रामटेक) यांनी दुधाळा (कवडक) शिवारातील शेती ठेक्याने केली आहे. त्या शेतात साैर ऊर्जा संयंत्र लावले आहे. चाेरट्याने त्या संयंत्राच्या १५ प्लेट काढून चाेरून नेल्या. ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. त्या प्लेटची एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस नाईक दीपक यादव करीत आहेत.

Web Title: Sawyer fled the plate of energy