‘समीक्षा’ला सव्वादोन लाख दंड

By Admin | Updated: August 15, 2014 00:41 IST2014-08-15T00:41:18+5:302014-08-15T00:41:18+5:30

सव्वादोन लाखांचा दंड

Savvodon million penalties for 'review' | ‘समीक्षा’ला सव्वादोन लाख दंड

‘समीक्षा’ला सव्वादोन लाख दंड


सोलापूर: शहरातील कचरा उचलण्याबाबत हयगय करणाऱ्या समीक्षा कंपनीला महापालिकेने बुधवारी सव्वादोन लाखांचा दंड ठोठाविला आहे.
शहरातील कचरा उचलण्याचा ठेका समीक्षा या खासगी कंपनीला देण्यात आला आहे. शनिवार व रविवारी डिझेल नसल्याने गाड्या बंद होत्या. सोमवारी सहायक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी ठेकेदाराला तंबी दिल्यावर काही गाड्या धावल्या. पण बुधवारी कामगारांनी दीड महिन्यापासून पगार मिळाला नाही म्हणून कामबंद आंदोलन केले. त्यामुळे एकही घंटागाडी जागची हलली नाही. शहरात दररोज अडीचशे टन कचरा उचलला जातो. चार दिवसात हजार टन कचरा साठला गेला.
बुधवारी कचरा न उचलला गेल्याने प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके यांनी कंपनीचे व्यवस्थापक खान यांना दंडाची नोटीस बजावली. शहरात सर्व विभागात कचऱ्याचे १२00 स्पॉट आहेत. कंपनीने करारात ठरल्याप्रमाणे कचरा उचलला नाही म्हणून प्रत्येकी स्पॉट २00 प्रमाणे कंपनीला सव्वादोन लाख दंड करण्यात आला.

Web Title: Savvodon million penalties for 'review'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.