सावनेर, काटोलची स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:09 IST2021-03-07T04:09:34+5:302021-03-07T04:09:34+5:30

सावनेर/काटोल/कळमेश्वर/कुही/रामटेक/नरखेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. सावनेर आणि काटोल तालुक्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली ...

Savner, Katol's condition is critical | सावनेर, काटोलची स्थिती चिंताजनक

सावनेर, काटोलची स्थिती चिंताजनक

सावनेर/काटोल/कळमेश्वर/कुही/रामटेक/नरखेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. सावनेर आणि काटोल तालुक्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी २७६ रुग्णांची नोंद झाली. यातील ५९ रुग्ण एकट्या सावनेर तालुक्यातील आहेत.

सावनेर शहरात १६ रुग्णांची पुन्हा भर पडली आहे. यासोबतच तालुक्यातील ग्रामीण भागात खापा, बोरुजवाडा येथे प्रत्येकी ४, खुरजगाव, वाघोडा चनकापूर, पाणऊबाळी येथे प्रत्येकी ३, दहेगाव, पाटणसावंगी, केळवद, भागेमाहेरी, खापरखेडा वेकोली येथे प्रत्येकी २ तर पिपळा, पटकाखेडी, एसईबी कॉलनी, चिचोली, भानेगाव, परसोडी, गुजरखेडी, इसापूर, मंगसा, तेलकामठी, सुसंद्री येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

काटोल तालुक्यात शनिवारी १५८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील चार, तर ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. शहरात रामदेव बाबा ले-आउट, पुरुषोत्तम मंदिर, पंचवटी, तारबाजार येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये येनवा, वाई येथे प्रत्येकी तर अंबाडा व कलंभा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ८८६ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

कळमेश्वर तालुक्यात शनिवारी २१ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील १०, तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात तेलकामठी येथे दोन, तर उबाळी, घोराड, पानउबाळी, मोहपा, बोरगाव (बु.), निळगाव, वाढोणा, घोगली, दहेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. हिंगणा तालुक्यात आणखी ८ रुग्णांची भर पडली आहे.

नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवारी आठ रुग्णांची नोंद झाली. सध्या ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णाची संख्या २५६, तर शहरातील ४६ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात जलालखेडा येथे २, मोवाड (५), मेंढला येथे एका रुग्णाची नोंद झाली.

रामटेकमध्ये दोन रुग्ण

रामटेक तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग कमी आहे. शनिवारी तालुक्यात दोन रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील अंबाळा वॉर्ड, तर ग्रामीण भागात सीतापूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११४८ झाली आहे. यातील १०१८ रुग्ण बरे झाले आहेत.

मेंढेगाव, मांढळमध्ये टक्का वाढला

कुही तालुक्यात शनिवारी १५ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात मेंढेगाव व मांढळ येथे रुग्णसंख्येत सातत्याने वाढत आहे. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय कुही येथे ३५५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात मेंढेगाव येथे १३, तर मांढळ येथे दोन रुग्णांची नोंद झाली.

Web Title: Savner, Katol's condition is critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.