शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
6
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
7
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
8
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
10
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
11
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
12
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
14
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
15
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
16
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
17
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
18
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
19
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

बचत भवनाचा मेकओव्हर होणार

By admin | Updated: May 12, 2014 00:59 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहाला लवकरच नवा चेहरा (लूक) मिळणार आहे. इमारत नुतनीकरणाच्या तयारीला सुरुवातही झाली आहे.

 नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहाला लवकरच नवा चेहरा (लूक) मिळणार आहे. इमारत नुतनीकरणाच्या तयारीला सुरुवातही झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षाच्या मागच्या बाजूला बचत भवन सभागृह आहे. महसूल खात्याच्या बैठका, जिल्हा व नियोजन समितीच्या बैठका आणि कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम या सभागृहात घेतले जातात. मात्र गेल्या काही वर्षापासून देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. नियमितपणे न होणारी रंगरंगोटी, फर्निचरची मोडतोड, पावसाळ्यात साचणारे पाणी, गळणार्‍या भिंती यामुळे सभागृहाची दूरवस्था झाली होती. मात्र त्याही अवस्थेत सभागृहाचा वापर नियमित होत होता. लोकसभा निवडणुकीच्या काळातही सभागृहात अधिकार्‍यांच्या बैठका, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम झाले. या काळातच जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या नजरेस सभागृहाची दूरवस्था आली. त्यानंतर नुतनीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या. सध्या सभागृहातील संपूर्ण फर्निचर बाहेर काढण्यात आले आहे. तेथील खुर्च्या विविध विभागात पाठवण्यात आल्या आहेत. पुढच्या काळात आहे त्या जागेवरच नवीन सभागृह उभे झालेले दिसेल. त्याचा ‘लूक’ गडचिरोलीतील सभागृहासारखा असण्याची दाट शक्यता आहे. नवीन सभागृहात नवीन खुर्च्यांसह इतर फर्निचरही नवीन असेल. त्याची रचनाही बदललेली असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९८४ मध्ये या सभागृहाचे बांधकाम करण्यात आले होते. अल्पबचत निधीतून हे बांधकाम करण्यात आल्याने त्याचे नावही बचत भवन ठेवण्यात आले. त्यानंतर होत असलेले हे दुसरे नुतनीकरण आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे व तत्कालीन पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या हस्ते नुतनीकरण झालेल्या सभागृहाचे उद््घाटन झाले होते. (प्रतिनिधी)