थेंबाथेंबाची बचत व्हावी

By Admin | Updated: May 22, 2016 02:47 IST2016-05-22T02:47:44+5:302016-05-22T02:47:44+5:30

‘लोकमत’ च्या ‘जलमित्र सेल्फी’ या उपक्रमाला विदर्भातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Save the droppings | थेंबाथेंबाची बचत व्हावी

थेंबाथेंबाची बचत व्हावी

‘सेल्फी’ ला प्रतिसाद : पाणी बचतीचा संदेश
नागपूर : ‘लोकमत’ च्या ‘जलमित्र सेल्फी’ या उपक्रमाला विदर्भातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातील वाचकांकडून पाणी बचतीच्या संदेशासह मोठ्या प्रमाणात ‘सेल्फी’ प्राप्त होत आहेत. यात शनिवारी उपराजधानीसह विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा येथील वाचकांनी ‘लोकमत’ कडे शेकडो सेल्फी पाठविल्या.
विशेष म्हणजे, ‘लोकमत’ ने राज्यभरात ‘जलमित्र’ अभियान सुरू केले आहे. या सहा आठवड्याच्या अभियानात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, सध्या ‘जलमित्र सेल्फी’ हा खास उपक्रम राबविल्या जात आहे. यात ‘लोकमत’ च्या वाचकांना पाणी बचतीचा संदेश देणारा स्वत:चा सेल्फी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार ‘लोकमत’ कडे प्राप्त होणाऱ्या सेल्फीमधून काही निवडक सेल्फी प्रकाशित केल्या जात आहे. ‘जलमित्र’ अभियानाला सर्वच स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख रेस्टारंट आणि हॉटेल्समध्ये विविध जनजागृतीचे कार्यकम राबविण्यात आले. शिवाय हॉटेल्समध्ये पाणी बचतीचा संदेश असलेले पोस्टर्स, स्टॅन्डी व टेबल कार्ड ठेवून, तेथील वेटर्स व कर्मचाऱ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. एवढेच नव्हे, तर सर्व हॉटेल्स व रेस्टरंटमध्ये ‘लोकमत’ तर्फे एक ड्रम ठेवून, त्यात ग्राहकांच्या ग्लासातील शिल्लक पाणी गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यातून रोज प्रत्येक हॉटेल व रेस्टारंटमध्ये हजारो लिटर पाण्याची बचत झाली. यानंतर त्या पाण्याचा त्याच हॉटेल व रेस्टारंटमध्ये इतर कामासाठी उपयोग करण्यात आला. आता या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने ‘जलमित्र सेल्फी’ हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Save the droppings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.