सौरभला तिहेरी मुकुट
By Admin | Updated: June 4, 2015 02:36 IST2015-06-04T02:36:56+5:302015-06-04T02:36:56+5:30
प्रतिभावान सौरभ केराळकरने नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित लोकमत जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत तिहेरी यश मिळवले.

सौरभला तिहेरी मुकुट
लोकमत जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा : मालविका, वैष्णवी व ईशानचे दुहेरी यश
नागपूर : प्रतिभावान सौरभ केराळकरने नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित लोकमत जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत तिहेरी यश मिळवले.
रातुम नागपूर विद्यापीठाच्या सुभेदार सभागृहात अंतिम लढतीत सौरभने आरबीआयच्या प्रणव लोखंडेचा २१-९, २१-१९ ने पराभव केला. त्याआधी, त्याने १९ वर्षांखालील गटात अंतिम लढतीत रोहन गुरबानीची झुंज २१-१३, १०-२१, २२-२० ने मोडून काढली. दुहेरीमध्ये वेदांत व्यासच्या साथीने खेळताना सौरभने अंगद मठारू व परम मुधोळकर जोडीचा २१-७, २१-१० ने पराभव केला.
मालविका बन्सोड, वैष्णवी भाले व ईशान विठाकर यांनी दुहेरी यश मिळवले. १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत मालविकाने आर्या अंचलवारविरुद्ध २१-९, २१-१० ने सरशी साधली. महिला दुहेरीत मालविकाने वैष्णवी भालेच्या सातीने खेळताना राधा व राशी या जोडीचा २१-१२, २१-१५ ने पराभव केला. महिला एकेरीच्या अंतिम लढतीत वैष्णवी भालेने मुग्धा आगरेचा २१-७, २१-११ ने पराभव केला. त्यानंतर मिश्र दुहेरीत वैष्णवी भाले व तिचा सहकारी गोविंद सहस्रभोजनी यांनी मनन गोयंका व मृण्मयी सावजी यांची झुंज १५-२१, २१-१४, २१-१५ ने मोडून काढली. ईशान विठाळकरने १३ वर्षांखालील मुलांच्या विभागात एकेरी व दुहेरीत जेतेपदाचा मान मिळवला.
लोकमत मीडियाचे संचालक (आॅपरेशन) अशोक जैन यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. यावेळी एनडीबीएच्या अध्यक्ष कुंदाताई विजयकर आणि सचिव मंगेश काशीकर व्यासपीठावर उपस्थित होते. जैन यांनी यावेळी विविध गटातील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणाऱ्या एनडीबीएच्या पदाधिकाऱ्यांची प्रशंसा केली. (क्रीडा प्रतिनिधी)
निकाल (अंतिम फेरी)
पुरुष एकेरी :- सौरभ केराळकर मात प्रणव लोखंडे २१-९, २१-१९. महिला एकेरी :- वैष्णवी भाले मात मुग्धा आगरे २१-७, २१-११. पुरुष दुहेरी :- जयेंद्र ढोले/अजय दयाल मात समित दंडवते/गोविंद सहस्रभोजनी १९-२१, २१-१६, २१-११. महिला दुहेरी : मालविका बन्सोड /वैष्णवी भाले मात राधा मुंडले / राशी लाम्बे २१-१२, २१-१५. १३ वर्षांखालील मुले एकेरी :- ईशान विठाळकर मात किर्तेश चौधरी २१-१३ (माघार). १३ वर्षांखालील मुली (एकेरी) :- अशानी जोशी मात निकिता जोसेफ २१-१२, २१-१०. १३ वर्षांखालील मुले दुहेरी :- ईशान विठाळकर / किर्तेश चौधरी पुढे चाल सिद्धांत बावणकर / युगंधर देव. १३ वर्षांखालील मुली (दुहेरी) :- अशानी जोशी / सोफिया सिमोन मात निकिता जोसेफ / वैदेही गोखे २१-१३, २१-१२. १५ वर्षांखालील मुले (एकेरी) :- रोहन गुरबानी मात सुधांशू भुरे २१-१८, २१-१२. १५ वर्षांखालील मुली :- मालविका बन्सोड मात आर्या अंचलवार २१-९, २१-१०. १५ वर्षांखालील मुले (दुहेरी) :- जसकरन सुरी / सुधांशू भुरे मात अभिराम सहस्रभोजनी / श्रीनिवास सावजी २१-८, २१-१६. १५ वर्षांखालील मुली (दुहेरी ):- पलक ठक्कर / राधा बापट मात आर्या अंचलवार / लिव्हिया फर्नांडिस २१-१९ ,२१-१७. १७ वर्षांखालील मुले (एकेरी) :- सुधांशू भुरे मात गौरव मिठे १९-२१, २१-१२, २१-१९. १७ वर्षांखालील मुली (एकेरी) :- मुग्धा आगरे मात राधा मुंडले २१-१६, २१-१७. १७ वर्षांखालील मुले (दुहेरी) :- गौरव मिठे / सौरभ केराळकर मात अंशुल दुर्गपुरोहित / मोहक बडकस २१-१८, २१-१५. १७ वर्षांखालील मुली ( दुहेरी) :- राधा मुंडले / राशी लांबे मात आर्या अंचलवार / लिव्हिया फर्नांडिस २१-८, २१-७. १९ वर्षांखालील मुले (एकेरी) :- सौरभ केराळकर मात रोहन गुरबानी २१-१३, १९-२१, २२-२०. १९ वर्षांखालील मुली (एकेरी) :- मृण्मयी सावजी मात राधा मुंडले २१-८, २१-१२. १९ वर्षांखालील मुले (दुहेरी) :- सौरभ केराळकर / वेदांत व्यास मात अंगद / परम मुधोळकर २१-०७, २१-१०.