शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सत्यजित तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:12 IST

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सत्यजित तांबे यांनी सर्वाधिक मते प्राप्त करत अध्यक्षपदाची बाजी मारली आहे. ते ३८ हजारहून अधिक मतांनी निवडून आले. तर आ.अमित झनक व कुणाल राऊत हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. हे दोघेही मतगणनेत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिले.

ठळक मुद्देसंघटनात्मक निवडणुकांचा निकाल जाहीर : अमित झनक, कुणाल राऊत उपाध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सत्यजित तांबे यांनी सर्वाधिक मते प्राप्त करत अध्यक्षपदाची बाजी मारली आहे. ते ३८ हजारहून अधिक मतांनी निवडून आले. तर आ.अमित झनक व कुणाल राऊत हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. हे दोघेही मतगणनेत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिले.९ सप्टेंबरला युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेंतर्गत विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान सुरू झाले. निवडणूक प्रक्रियेतून प्रदेश अध्यक्ष, प्रदेश महामंत्री, शहराध्यक्ष, महामंत्री, विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. शुक्रवारी नागपूर येथील देवडिया कॉंग्रेस भवनात मतमोजणी झाली व दुपारी निकाल जाहीर करण्यात आले. सत्यजित तांबे यांना ७० हजार १८९ मते मिळाली. अमित झनक यांना ३१ हजार ९९९ तर कुणाल राऊतला ७ हजार ७४४ मते मिळाली. सत्यजित तांबे हे एकूण ३८ हजार १९० मतांनी निवडून आले. याच निवडणुकीतून ६० युवकांची प्रदेश कार्यकारिणीदेखील निवडण्यात आली आहे.नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दोनवेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१४ साली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून ‘एनएसयूआय’ आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात त्यांनी संघटनबांधणी केली आहे.काँग्रेसचा दावा, ही घराणेशाही नाहीयुवक काँग्रेसच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी राजकीय कुटुंबातीलच उमेदवार निवडून आले आहेत. सत्यजित तांबे हे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. आ.अमित झनक हे दिवंगत नेते तसेच माजी महिला व बालकल्याण मंत्री सुभाष झनक यांचे पुत्र आहेत. तर कुणाल राऊत हे अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या ‘एससी सेल’चे अध्यक्ष नितीन राऊत यांचे पुत्र आहेत. असे असले तरी ही घराणेशाही नसल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. घराणेशाही संपविण्यासाठीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ह्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यामुळे सर्वांना निवडणूक लढविण्याची आणि त्यात विजय मिळविण्याचा अधिकार मिळाला असल्याचा दावा काँग्रेसचे नेते राहुल ठाकरे यांनी केला आहे.सर्व घटकातील तरुणांना काँग्रेसशी जोडणार : तांबेअध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी ‘लोकमत’जवळ आपली भावना व्यक्त केली. युवक काँग्रेस अध्यक्षपदी विजयी झालो याचा आनंद आहे. आता जबाबदारी आणखी वाढली आहे. २०१९ च्या निवडणुका युवक काँग्रेससमोरील मोठे आव्हान आहे. निवडणुकीसाठी ताकदीने युवकांची फळी उभारण्याचा, सर्व घटकातील युवकांना काँग्रेसशी जोडण्याचा प्रयत्न असेल. २०१४ मध्ये तरुणाई भाजपाकडे वळली होती. मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला. आता या युवकांना राहुल गांधी यांचे विचार पटवून देऊन पुन्हा काँग्रेससकडे परत आणण्यासाठी मोहीम हाती घेऊ, असे प्रतिपादन सत्यजित तांबे यांनी केले.अधिकृत घोषणा शनिवारीअध्यक्ष, उपाध्यक्ष वगळता महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या इतर नवनिर्वाचित उमेदवारांची अधिकृत घोषणा शुक्रवारी झाली नाही. मात्र उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या माहितीवरुन महासचिव व सचिवपदाच्या उमेदवारांची नावे समोर आली आहेत. आम्ही सविस्तर निकाल शनिवारी आमच्या ‘आयवायसी.इन’ या संकेतस्थळावर जाहीर करु, अशी माहिती निवडणूक प्रक्रियेचे जनसंपर्क अधिकारी सुधीर चौधरी यांनी दिली.अध्यक्षसत्यजित तांबेउपाध्यक्षअमित झनक, कुणाल राऊत, मसरुर खान, नागसेन भेर्जेमहासचिवआदित्य सावळेकर, आमीर अब्दुल सलिम, आदित्य पाटील, ब्रिजकिशोर दत्त, अनिकेत म्हात्रे, करण ससाने, श्रीनिवास नलमवारसचिवअभय देशमुख, अभिजित अवचार, अभिषेक भार्गड, अजयकुमार इंगवले, अजिंक्य भोईर, अजित सिंग, अकिल पटेल, अलोक पवार, अमरिश भोई, आशिष गिरी, अतुल वाघ, भास्कर गुंजाल, भूषण मरसकोल्हे, दिग्विजय दळवी, फिरोज शाह, गणेश जगताप, इद्रीस नवाब खान, इंद्रजित साळुंके, जयदीप शिंदे, महानिंगप्पी महाशेट्टी, मिलिंद चिट्टे, मो.कादर शेख, नीलेश काटे, नीलेश खोब्रागडे, नितीन पाटील, पंकज जगताप, प्रभाकर मुत्थे, पुनित पाटील, राजीव पाटील, रोहित खैरवार, रुचित दवे, रुपेश जैस्वाल, सचिन कट्याल, सचिन पाटील, सागर देशमुख, सागर कावरे, सलाम अब्दुल, समीर जवंजाळ, शंभुराजे देसाई, श्रेयस इंगोले, तनवीर अहमद सिद्दीकी, उमेश ठाकूर, विकी बघेले, विजयसिंग मोरे, विक्रम ठाकरे, विनोद भोसले, महेश ढगे

 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक