शनिवारी विक्रम, पण रविवारी राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:12+5:302021-06-27T04:07:12+5:30
एकाच दिवशी ४७,१८४ लाभार्थींना डोस लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने आखलेल्या नव्या धोरणानुसार व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ...

शनिवारी विक्रम, पण रविवारी राहणार बंद
एकाच दिवशी ४७,१८४ लाभार्थींना डोस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने आखलेल्या नव्या धोरणानुसार व राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यात १८ वर्षांवरील लसीकरणाला गेल्या बुधवारी सुरुवात झाली. एकाच दिवशी नागपूर जिल्ह्यात एकूण ४१ हजार ७२१ नागरिकांना डोस देण्यात आले होते, तर शनिवारी एकाच दिवशी ४७,१८४ जणांना डोस देण्यात आले. यात शहरात ३०,३१३ हजार, तर ग्रामीण भागात १६,८५१ जणांना डोस देण्यात आला. सर्वाधिक लसीकरणाचा हा नागपूर जिल्ह्यातील विक्रम आहे. परंतु शनिवारी विक्रम केला असला तरी डोस उपलब्ध नसल्याने रविवारी मनपा व शासकीय केंद्रावरील लसीकरण बंद राहील.
नागपूर शहरात शनिवारी ३०३१३ जणांना डोस देण्यात आले. यात मनपा व शासकीय केंद्रावर २८,०१२, तर खासगी रुग्णालयात २३०१ जणांना डोस देण्यात आले.
...
रविवारी लसीकरण बंद
शासनाकडून नागपूर महापालिकेला लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपा क्षेत्रातील कोणत्याही शासकीय व मनपाच्या लसीकरण केंद्रावर रविवारी रोजी नागरिकांचे लसीकरण होणार नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. डोस उपलब्ध होताच लसीकरणाला सुरुवात होईल. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.