सारनाथ फाउंडेशनने जागवले रक्तदानाचे कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:31+5:302021-07-18T04:07:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेला साद देत सारनाथ फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. ...

सारनाथ फाउंडेशनने जागवले रक्तदानाचे कर्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेला साद देत सारनाथ फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. या शिबिरात फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि रक्तदानाचे कर्तव्य बजावले.
बॅनर्जी लेआऊट, रामेश्वरी येथील सेंट्रल प्रोव्हिन्शिअल स्कूलमध्ये पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन सारनाथ फाऊंडेशनचे संचालक डॉ. निशांत नारनवरे, संचालक मेघा नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव ठेवत आयोजित या शिबिरात नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनीही आपले कर्तव्य बजावले. सेंट्रल प्रोव्हिन्शिअल स्कूल, साईनाथ ब्लड बँकेच्या सहयोगाने पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात स्वाती रामटेके, आकाश रामटेके, निशांत भाकनाथ, अमोल चिमणकर, पंकज राजवरकर, प्रशांत घारकर, प्रशांत शाहू, अनुप निकोडे यांनी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. यावेळी डॉ. कळमकर यांच्या मार्गदर्शनात कल्याणी भुते, रूपाली कावळे, कृष्णा व अक्षय यांनी सहकार्य केले.
..............