रिना झाल्या एक मताने ‘सरदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST2021-01-19T04:09:49+5:302021-01-19T04:09:49+5:30

रिना सरदार या धामना लिंगा ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ४ मधून जयजवान जय किसान या पॅनलच्या नेतृत्वात लढत होत्या. ...

'Sardar' by one vote | रिना झाल्या एक मताने ‘सरदार’

रिना झाल्या एक मताने ‘सरदार’

रिना सरदार या धामना लिंगा ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ४ मधून जयजवान जय किसान या पॅनलच्या नेतृत्वात लढत होत्या. त्यांच्याविरोधात नलू शेंडे या दुसऱ्या पॅनलच्या उमेदवार होत्या. धामना लिंगा ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू झाली आणि रिना सरदार आणि नलू शेंडे यांच्यात एक एक मतांची रस्सीखेच सुरू झाली. संपूर्ण मतमोजणी आटोपल्यानंतर रिना यांना २५३ मते पडली, तर नलू शेंडे यांना २५२ मते मिळाली. रिना यांना एक मत अधिक असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषित केले. रिना या विजयी झाल्याची वार्ता त्यांचे पती सुनील सरदार यांना कळताच त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला. जल्लोषासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ते छाती ठोकून एक मताने निवडून आल्याचे जोशात सांगत फिरत होते. रिना सरदार यांच्या कुटुंबीयांमध्येही त्या एक मताने निवडून आल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.

Web Title: 'Sardar' by one vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.