रक्तदानासाठी सरसावली आंबेडकरी तरुणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST2021-04-12T04:07:26+5:302021-04-12T04:07:26+5:30
नागपूर : काेराेनाच्या महामारीमुळे परिस्थिती अतिशय भयकारी हाेत चालली आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने वैद्यकीय सेवा डगमगायला ...

रक्तदानासाठी सरसावली आंबेडकरी तरुणाई
नागपूर : काेराेनाच्या महामारीमुळे परिस्थिती अतिशय भयकारी हाेत चालली आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने वैद्यकीय सेवा डगमगायला लागली आहे. या परिस्थितीत रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने गरजवंत रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. अशावेळी तरुणांनी पुढाकार घेत रक्तदान अभियान चालविले आहे. क्रांतिसूर्य ज्याेतिबा फुले आणि महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयाेजन केले जात आहे.
प्रियदर्शी सम्राट अशाेक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून तरुणांनी रक्तदानाचा यज्ञ लावण्याचा निर्धार केला आहे. संस्थेचे संयाेजक अनिकेत कुत्तरमारे यांनी सांगितले, संस्थेच्या तरुणांनी सातत्याने रक्तदान शिबिरे आयाेजित केली आहेत. यापूर्वी १४ ऑक्टाेबर, २५ ऑक्टाेबर, ६ डिसेंबर आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दक्षिण नागपुरातील विविध विहारांमध्ये रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यातून रक्ताच्या १८० बॅगचा पुरवठा मेडिकल रुग्णालयाला करण्यात आला. आता पुन्हा १४ एप्रिल राेजी कुकडे ले-आऊट परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात येत आहे. मेडिकल प्रशासनाकडूनही रक्ताची गरज असल्याचे सांगून रक्तदान करण्याचे आवाहन केल्याचे अनिकेतने सांगितले. महामानवाच्या जयंतीनंतरही रक्तदानाचे अभियान सातत्याने घेण्याचा निर्धार अनिकेतने ‘लाेकमत’शी बाेलताना केला. आजची गरज लक्षात घेता, इतरही आंबेडकरी तरुणांनी रक्तदानासाठी पुढाकार घेऊन बाबासाहेबांना सेवेतून अभिवादन करण्याचे आवाहन अनिकेतने केले.
१३० बुद्ध विहारांमध्ये वृक्षाराेपण
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून शहरातील १३० बुद्ध विहारांमध्ये वृक्षाराेपण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दलाचे सैनिक प्रशिक वाहने यांनी सांगितले, १२, १३ आणि १४ एप्रिल राेजी विविध बुद्ध विहारांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत कोरोनासंबंधी नियम पाळून वृक्षाराेपण करण्यात येईल. सिद्धार्थ बनसाेड, शुभम दामले, वैशाली घुटके, शीतल गडलिंग, अनिकेत कुत्तरमारे आदींनी यासाठी पुढाकार घेतला आहे.