सराफ चेंबर आयकर कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 08:29 PM2020-07-31T20:29:46+5:302020-07-31T20:32:21+5:30

आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात कार्यरत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Saraf Chamber Income Tax Office Staff Corona Positive | सराफ चेंबर आयकर कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

सराफ चेंबर आयकर कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात कार्यरत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कर्मचारी सराफ चेंबरच्या तिसऱ्या माळ्यावरील प्रधान सीआयटी-३ अंतर्गत रेंज-४ मध्ये कार्यरत आहे. तो आजारी असल्याने गेल्या चार ते पाच दिवसापासून कार्यालयात अनुपस्थित होता. कर्मचारी चाचणीत पॉझिटिव्ह निघाल्याचा संदेश दुपारी कार्यालयात धडकला. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवार आणि रविवारी कार्यालयाला सुटी आहे. यादरम्यान कार्यालय सॅनिटाईज्ड करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी आयकर भवन, सिव्हील लाईन्स येथे प्रधान आयकर आयुक्त आणि आयकर आयुक्तांच्या (प्रशाासन) कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्यावेळी आयकर भवन तीन दिवस बंद ठेवून संपूर्ण परिसर सॅनिटाईज्ड करण्यात आला होता.

Web Title: Saraf Chamber Income Tax Office Staff Corona Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.