शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

संतोष आंबेकरची तुरुंगात रवानगी

By admin | Updated: March 10, 2016 03:35 IST

गॅँगस्टर संतोष आंबेकरला शोधून काढण्यात अपयशी ठरलेल्या शहर पोलिसांना त्याची पोलीस कोठडीसुद्धा वाढवून घेता आली नाही.

पोलीस कोठडीत वाढ नाही नागपूर : गॅँगस्टर संतोष आंबेकरला शोधून काढण्यात अपयशी ठरलेल्या शहर पोलिसांना त्याची पोलीस कोठडीसुद्धा वाढवून घेता आली नाही. केवळ सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आंबेकरची तुरुंगात रवानगी झाली. २७ जानेवारी रोजी मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच आंबेकर फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पोलिसांनी आंबेकरच्या घरी धाड टाकून चल-अचल संपत्तीचे दस्तऐवज जप्त केले होते. त्यानंतरही तो हाती लागला नव्हता. त्याच्या शोधात पोलीस दिल्ली, मुंबई आणि इंदोरपर्यंत जाऊन रिकाम्या हाती परतले होते. त्यानंतर पोलिसांनी आंबेकरची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिसांच्या कारवाईची माहिती होताच २ मार्च रोजी आंबेकर परत आला. त्याच्यासोबतच प्रकाश मानकर नावाचा आरोपीसुद्धा अटक करण्यात आली. दोघांनाही ३ मार्च रोजी न्यायालयात सादर करून ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली. सूत्रानुसार कोठडीदरम्यान पोलीस आंबेकर प्रकरणाशी संबंधित कुठलीही ठोस माहिती मिळवू शकले नाही. आंबेकरने पोलिसांना आपल्या गोष्टींमध्ये फसवून सात दिवस काढले. तपासाच्या प्रगतीच्या आधारावर कोठडीत वाढ करण्याची पोलिसांची मागणी बुधवारी मोका न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने न्यायिक कोठडीत दोघांनाही तुरुंगात पाठविले. या प्रकरणात युवराज माथनकर, संजय फातोडे, विजय बोरकर, लोकेश कुभिटकर, सचिन आडुलकर, आकाश बोरकर, शक्ती मनपिया आणि विनोद मसराम यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. केवळ गौतम भटकर हा आरोपी फरार आहे. (प्रतिनिधी)