शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संजय यादव नागपूर जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:08 IST

राज्य शासनाने मंगळवारी ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. यात नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. १५ दिवसापूर्वीच त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या जागी भंडाराचे जिल्हाधिकारी एस.के. दिवसे यांना पाठविण्यात आले आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजय यादव रुजू होत आहेत.

ठळक मुद्देमाधवी खोडे परतल्या : दिवसे मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने मंगळवारी ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. यात नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. १५ दिवसापूर्वीच त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या जागी भंडाराचे जिल्हाधिकारी एस.के. दिवसे यांना पाठविण्यात आले आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजय यादव रुजू होत आहेत. या आधी ते ठाणे येथे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त होते. नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांची गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्याने हे पद गेल्या काही दिवसापासून रिक्त होते.शांतनू गोयल यांची २२ मे रोजी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली होती. २४ मे रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागासह १६ विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी नुकतीच कामाला सुरुवात केली होती. अन् अचानक त्यांची बदली करण्यात आली.महिला व बाल कल्याण विभागाच्या आयुक्त माधवी खोडे-चवरे यांची नियुक्ती वस्रोद्योग संचालकपदी (नागपूर) करण्यात आली आहे. आतापर्यंत या पदावर कार्यरत असलेले संजय मीना यांची बदली नाशिक येथे आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. माधवी खोडे-चवरे यापूर्वी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्त होत्या. त्या पुन्हा नागपुरात परतल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर