शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

संजय श्रीवास ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:09 IST

स्थानिक अनुभवी खेळाडू संजय श्रीवास याने रविवारी येथे संपलेल्या महापौर चषक विदर्भस्तर शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’चा किताब जिंकला.

ठळक मुद्देमहापौर चषक शरीरसौष्ठव: अमरावतीचा सर्वेश साहू ‘बेस्ट पोझर’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक अनुभवी खेळाडू संजय श्रीवास याने रविवारी येथे संपलेल्या महापौर चषक विदर्भस्तर शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’चा किताब जिंकला. अमरावतीचा सर्वेश साहू ‘बेस्ट पोझर’चा मानकरी ठरला.नागपूर महानगरपालिका आणि अ‍ॅमेच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लकडगंज भागातील कच्छी विसा मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सलग दुसºया वर्षी झालेल्या आयोजनात हजारो चाहत्यांच्या साक्षीने नामवंत खेळाडूंनी स्वत:च्या बलदंड शरीरयष्टीचे दर्शन घडवित वाहवा मिळविली.स्पर्धेचे मुख्य पाहुणे केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.कृष्णा खोपडे, कार्यकारी महापौर दीपराज पार्र्डीकर, सत्तापक्षनेते संदीप जोशी, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, मनपा क्र ीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय सभापती राजेश घोडपागे, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन (आयबीबीएफ)चे अध्यक्ष ‘पद्मश्री’ प्रेमचंद डेगरा, कार्यकारी सचिव चेतन पठारे, संयोजक व नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, संयोजन समिती सचिव राजेश तोमर, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष दीपक यादव, विदर्भ सचिव विश्वनाथ पळसपगार, सचिव अरु ण देशपांडे, विधितज्ज्ञ विक्र म रोटे, यांची उपस्थिती होती.राष्ट्रीय स्तरावर शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूरचे नाव उंचाविणारी महिला पॉवरलिफ्टर अल्फीया शेख हिचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महापौर चषक शरीरसौष्ठवस्पर्धेचे निकालनिकाल: ६० किलोपेक्षा कमी: शेख बाबा नागपूर, अक्षय टिकेकर अमरावती, दिनेश नंदनवार चंद्रपूर, अब्दुल लतिफ अकोला, महेश रहांगडले नागपूर.६० ते ६५ किलो: सुयोग तरोडे, अभिषेक पवार, मनीष बावरे, अक्षय गणेर, शुभम जवारे. ६५ ते ७० किलो: संजय श्रीवास, दिनेश बारोकर,आफाक खान, मुकेश साहू (सर्व नागपूर), तीर्थानंद कथेरिया काटोल.७० ते ७५ किलो: किशन तिवारी नागपूर, कमलेश कश्यप चंद्रपूर, चेतन काशीकर अकोला, दीपक पवार बुलडाणा, अंकित राजभोज अकोला. ७५ ते ८० किलो: राज शाहू अमरावती, सुरेंद्र साहू नागपूर, अंकुश धनबहादूर अकोला, इशान पंडित नागपूर, जमीर कुरेशी अकोला. ८० किलोच्यावर: सर्वेश साहू अमरावती, विजय भोयर अमरावती, वैभव मारकटवार अकोला, ओम यादव कामठी, महोम्मद ओवेस दिग्रस. संजय श्रीवास ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’(नागपूर)आणि सर्वेश साहू ‘बेस्ट पोझर’(अमरावती).