विरोधी पक्षनेतेपदी संजय महाकाळकर
By Admin | Updated: March 5, 2017 01:51 IST2017-03-05T01:51:16+5:302017-03-05T01:51:16+5:30
नागपूर महापालिकेतील काँग्रेसचा गटनेता अर्थात विरोधी पक्षनेतेपदी अडीच वर्षांसाठी संजय महाकाळकर यांची शनिवारी निवड करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेतेपदी संजय महाकाळकर
अडीच वर्षासाठी निवड : निरीक्षकांनी जाणून घेतली नगरसेवकांची मते
नागपूर : नागपूर महापालिकेतील काँग्रेसचा गटनेता अर्थात विरोधी पक्षनेतेपदी अडीच वर्षांसाठी संजय महाकाळकर यांची शनिवारी निवड करण्यात आली आहे. महाकाळकर हे प्रभाग ३० मधून निवडून आले असून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत.
काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण विचारात घेता गटनेत्यांची निवड करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी माजी मंत्री आरीफ नसीम खान व विनायक देशमुख यांना नागपुरात पाठविले होते. त्यांनी रविभवन येथे सर्व २८ नगरसेवकांची मते जाणून घेतली. राजीनामा पाठविणाऱ्या गार्गी चोपरा आल्या नाहीत. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गटनेतेपदी कुणाची निवड करावी, तुमची कुणाच्या नावाला सहमती आहे. गटनेतेपदाची जबाबदारी कोण सक्षमपणे पार पाडू शकेल, अशा आशयाचे प्रश्न प्रत्येक नगरसेवकांना विचारण्यात आले. या आधारावर गटनेत्यांची निवड करण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला.
गटनेतेपदासाठी माजी खा. विलास मुत्तेमवार व विकास ठाकरे यांच्या गटाचे समजले जाणारे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तानाजी वनवे व संजय महाकाळकर तर माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या गटाचे व महापालिकेत चौथ्यांदा निवडून आलेले
पाच तास चालली रस्सीखेच
गटनेतेपदासंदर्भात सकाळी ११ पासून दुपारी ३ असे चार तास नगरसेवकांसोबत स्वतंत्र चर्चा केली. परंतु काँग्रेसमधील गटातटामुळे चांगलीच रस्सीखेच सुरू होती. एका नावावर सर्वांची सहमती होत नव्हती. त्यामुळे आरीफ खान व विनायक देशमुख यांनी प्रफुल्ल गुडधे, तानाजी वनवे व संजय महाकाळकर यांच्याशी पुन्हा संयुक्त चर्चा केली. या चर्चेनंतर निरीक्षकांनी प्रदेश काँग्रेसकडे संमतीसाठी पाठविले. तासभरानंतर प्रदेश काँग्रेसची संमती आली व त्यानंतर शहर काँग्रेसतर्फे विभागीय आयुक्तांना संजय महाकाळकर यांच्या नावाचे पत्र सादर करण्यात आले.