शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

संजय दत्तने केला फर्लो नियमांचा भंग

By admin | Updated: January 11, 2015 00:54 IST

सिने अभिनेता संजय दत्त १४ दिवसाच्या मंजूर रजेनंतर उशिरा कारागृहात हजर झाला. त्याच्याकडून फर्लो नियमांचा भंग झाला आहे. त्यामुळे महाराष्ट तुरुंग अधिनियमाच्या तरतुदीनुसार

गुन्हा दाखल होण्याची तरतूद : शिक्षेचा कालावधी वाढण्याची शक्यतानागपूर : सिने अभिनेता संजय दत्त १४ दिवसाच्या मंजूर रजेनंतर उशिरा कारागृहात हजर झाला. त्याच्याकडून फर्लो नियमांचा भंग झाला आहे. त्यामुळे महाराष्ट तुरुंग अधिनियमाच्या तरतुदीनुसार तो कारवाईस पात्र आहे, असे स्पष्ट मत मुंबई बॉम्बस्फोट खटला चालविणारे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी आज लोकमतशी बोलताना मांडले. एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने अ‍ॅड. निकम आज नागपुरात आले होते. त्याअनुषंगाने त्यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने चर्चा केली. अ‍ॅड. निकम यांनी यावेळी फर्लोचा नियम आणि महाराष्ट तुरुंग अधिनियमाच्या तरतुदीचा हवाला देत म्हटले की, कारागृहातील कैदी त्याच्या कुटुंबीयांपासून आणि समाजापासून दुरावू नये म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून कैद्यासाठी एक तरतूद करण्यात आली. यानुसार, शिक्षा झालेल्या कैद्याला वर्षातून एकदा १४ दिवसांची रजा मागण्याचा अधिकार असतो. (म्हणजे, त्याला शिक्षेतून सूट मिळत नाही.) या १४ दिवसांच्या रजेदरम्यान अपवादात्मक स्थितीत संबंधित कैद्याला पुन्हा १४ दिवसांची पॅरोल (सलगपणे) रजा मिळू शकते. मात्र, त्यासाठी ठोस कारण हवे. ही वाढीव रजा देण्याचा निर्णय कारागृहाचे डीआयजी घेऊ शकतात. वाढीव रजेच्या कारणांची चौकशी आणि पोलिसांचा अहवाल मागून या वाढीव रजेसंदर्भात डीआजी निर्णय घेतात. या अर्जावर निर्णय झाला नसेल तर, यापूर्वी मंजूर झालेल्या फर्लो रजेच्या १४ दिवसानंतर कैद्याने तातडीने कारागृहात परतणे बंधनकारक आहे. सदरच्या अर्जावर निर्णय झाला नाही किंवा त्याची माहिती मिळाली नाही, ही सबब पुढे करून कारागृहात परतणे संबंधित कैदी टाळू शकत नाही. असे कुणी कैदी करीत असेल तर तो तरतुदीचा गैरवापर करीत असल्याचे स्पष्ट होते. त्यात भारतीय दंड विधानाच्या कलम २२४ अन्वये दंडात्मक कारवाईस पात्र ठरतो. एवढेच नव्हे तर फर्लो तरतुदीचा भंग करणाऱ्या कैद्याविरुद्ध तुरुंगाधिकारी आयपीसीच्या कलम २२४ अन्वये पोलिसांकडे तक्रार करू शकतात आणि संबंधित कैद्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. संजय दत्तच्या प्रकरणात असाच प्रकार झाला. त्यामुळे तो कारवाईस पात्र असल्याचे अ‍ॅड. निकम म्हणाले. (प्रतिनिधी)‘माफी‘लाही कात्री प्रत्येक कैद्याला ज्याप्रमाणे वर्षभरात एकदा फर्लो तरतुदीनुसार १४ दिवसांची रजा उपभोगण्याचा अधिकार आहे. त्याच प्रमाणे त्याला त्याच्या शिक्षेतून प्रत्येक महिन्यात ७ दिवसांची सुट (माफी) ही मिळत असते. मात्र, फर्लोची १४ दिवसांची रजा उपभोगल्यानंतर तो लगेच कारागृहात परतला नसेल तर त्याने फर्लो तरतुदीचा भंग केल्याचे मानले जाते. अशा कैद्याला ‘त्या‘ १४ दिवसानंतर जेवढे दिवस तो कारागृहातून बाहेर असेल तेवढ्या दिवसाची प्रत्येक दिवसाला ५ या प्रमाणे त्याच्या माफीचे (सूट) दिवस रद्द होऊ शकतात, असेही अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.