गावांचे सॅनिटायझेशन, फेसशिल्डचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:10 IST2021-05-25T04:10:08+5:302021-05-25T04:10:08+5:30

रेवराल : माैदा शहरासह ग्रामीण भागातील काेराेन संक्रमण राेखण्यासाठी एनटीपीसी प्रशासनाने काेराेना संक्रमित भागाचे सॅनिटायझेशन करायला सुरुवात केली. एवढेच ...

Sanitation of villages, distribution of face shields | गावांचे सॅनिटायझेशन, फेसशिल्डचे वितरण

गावांचे सॅनिटायझेशन, फेसशिल्डचे वितरण

रेवराल : माैदा शहरासह ग्रामीण भागातील काेराेन संक्रमण राेखण्यासाठी एनटीपीसी प्रशासनाने काेराेना संक्रमित भागाचे सॅनिटायझेशन करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर काेराेना लसीकरण माेहिमेत सुसूत्रता यावी म्हणून तालुक्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रांना संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांना फेसशिल्डचे वाटप करण्यात आले.

एनटीपीसीच्या वतीने ग्रामीण भागात स्वतंत्रपणे काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना राबविण्यात येत आहे. यात एनटीपीसीने माैदा येथील काेविड सेंटरला वाॅटर फिल्टर, शासकीय कर्मचाऱ्यांना व नागरिकांना फेसशिल्ड तसेच लसीकरण नाेंदणीसाठी चिरव्हा व धानला प्राथमिक आराेग्य केंद्रांना संगणक संच भेट दिले आहेत. शिवाय, ग्रामीण भागातील नागरिकांना वितरित करण्यासाठी तीन हजार फेसशिल्ड तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या स्वाधीन केले आहेत. शहर व ग्रामीण भागातील काेराेना संक्रमित भागाचे अग्निशमन दलाच्या मदतीने नियमित सॅनिटायझेशन केले जात आहे. या मदतकार्यात एनटीपीसीतील अधिकाऱ्यांच्या घरातील महिलांच्या समृद्धी लेडीज क्लबनेही खारीचा वाटा उचलला आहे. अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या घरातील सदस्य नागरिकांमध्ये काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करणे व लसीकरण करणे याबाबत जनजागृती करीत आहेत.

===Photopath===

240521\img-20210503-wa0013.jpg

===Caption===

एनटीपीसी मौदा साॅनिटाजर ची फवारणी चे फोटो

Web Title: Sanitation of villages, distribution of face shields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.