शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मजुरांना नीरी शिकविणार सॅनिटायझेशन तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 11:16 IST

मजूर, विद्यार्थी तसेच निराश्रिताना सॅनिटायझेशन राखण्याचे प्रशिक्षण नीरी देणार आहे.

ठळक मुद्देडीएलएसए, एनजीओसोबत विशेष बैठकइंग्रजी, मराठी व हिंदी भाषेत प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थलांतरित मजुरांची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करून आर्थिक आधार देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला दिले आहेत. उद्योग सुरू करता येईल पण या काळात कोरोनाचा फैलाव रोखणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. अशावेळी नागपूर शहरात नीरीने काही डीएलएसएच्या मदतीने मजूर तसेच निराश्रित आणि विद्यार्थ्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझेशनचे तंत्र शिकविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेत प्रशिक्षणथारिटी (डीएलएसए) तसेच काही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच नीरी येथे घेण्यात आली. यावेळी डीएलएसएचे सचिव न्या. अभिजित देशमुख, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, जलवायू परिवर्तन विभागाचे प्रमुख व मुख्य वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे, मुख्य वैज्ञानिक डॉ. साधना रायलू, आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास सोसायटीचे अरशद तन्वीर खान, समीर पटेल, आपुलकी सामाजिक संस्थेचे अमिताभ पावडे, डॉ समीर देशपांडे, नीरीचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. प्रदीप साळवे आदी उपस्थित होते.देशाची आर्थिक घडी सुधारण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणे अगत्याचे झाले आहे. त्यानुसार लवकरच शाळा, महाविद्यालये, उद्योग, हॉटेल्स सुरू होणार आहेत. अशावेळी त्यांच्या योग्य सॅनिटायझेशनचा प्रश्न महत्त्वाचा आहे. विशेषत: संशयित रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर व स्थलांतरित मजुरांसाठी तात्पुरता निवारा केंद्र बनविण्यात आलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा ठिकाणांच्या सुरक्षेसाठी नीरी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यानुसार मजूर, विद्यार्थी तसेच निराश्रिताना सॅनिटायझेशन राखण्याचे प्रशिक्षण नीरी देणार आहे.डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले, एपिडेमोलॉजि ही कामाचे ज्ञान, शक्यता व आकड्यावर अवलंबून असते. अशा भीषण परिस्थितीत सॅनिटायझेशन आणि कामाच्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. यासाठी प्रभावी धोरण आणि नियोजन गरजेचे आहे. ही आवश्यकता लक्षात घेत नीरीतर्फे इंग्लिश, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषेत प्रशिक्षण साहित्य बनविणार असल्याचे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले. इतर उपस्थित प्रतिनिधींनी यावेळी परिस्थिती आणि काय उपाय करता येईल, यावर आपली भूमिका मांडली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस