नेहरू महाविद्यालयात स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST2021-04-16T04:07:47+5:302021-04-16T04:07:47+5:30
वाडी : शहरातील जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात विद्यार्थ्यांना ...

नेहरू महाविद्यालयात स्वच्छता अभियान
वाडी : शहरातील जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
डाॅ. मनीषा चव्हाण यांनी विविध दाखले देत विद्यार्थ्यांना स्वच्छता व त्यातून जाेपासल्या जाणाऱ्या उत्तम आराेग्याचे महत्त्व पटवून दिले. यासाठी त्यांनी स्वच्छता असेल जिथे, लक्ष्मी वसेल तिथे, राखू परिसर स्वच्छ, ठेवेल आरोग्य स्वस्थ, अशा प्रकारचे नारे देऊन परिसर स्वच्छ ठेवा तसेच प्रत्येकाने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन डॉ. मनीष चव्हाण यांनी केले. यावेळ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या आवारात साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविले. विद्यार्थ्यांनी श्रमदान करून कामगारांना मास्कचे वाटप केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. सुधाकर बोरकर, हर्ष कापसे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते. यशस्वीतेसाठी प्रमोद पडोळे, अश्विन शेंडे यांनी सहकार्य केले.